छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारील शिडीची जागा त्वरित न हटविल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आमरण उपोषण करणार !!
मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या शेजारी लावलेल्या शिडी मुळे छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालायला सोयीस्कर व्हावे म्हणून लावलेल्या शिडीमुळे छत्रपतींचा पुतळा झाकला जातो. म्हणून मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे वारंवार विनंती अर्ज करण्यात आले.
मात्र नगरपंचायत प्रशासना कडुन कोणतीच कारवाई होत नाही. आता 19 फेब्रुवारी शिवजयंती हा दिवस जवळ येवून ठेपला आहे. तरी नगरपंचायत कडून कुठल्याही हालचाली होत नाही. म्हणुन आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी **शिडीचा ** मुद्दा ऐरणीवर आणला असुन सोमवार दिनांक 15/02/2021 पर्यंत सदरची **शिडी ** न हटवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस मुरबाड शहर शाखेच्या वतीने सोमवार दि.15/02/2021 रोजी पासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण करण्यात येणार असून उद्भवणाऱ्या, परिस्थितीला मुरबाड नगरपंचायत जबाबदार राहणार. अशी प्रतिक्रिया मुरबाड शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे यांनी आमचे प्रतिनिधी श्री. मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना सांगितले.


No comments:
Post a Comment