Sunday, 7 February 2021

अमळनेर ते शेगाव पायी वारीचे आयोजन !!

अमळनेर ते शेगाव पायी वारीचे आयोजन !!


अमळनेर, प्रतिनिधी :
अमळनेर येथील मुंदडानगर येथील भाविकांचे श्रद्धास्थान संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने दिनांक 15/02/2021 ते 20/02/ 2021 पर्यंत अमळनेर ते शेगाव पायी वारीचे आयोजन करण्यात आले आहे असे गजानन महाराज संस्थानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. आर.बी. पवार यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी पाच वाजता गजानन महाराज मंदिर मुंदडा गेटच्या समोर अमळनेर येथून पायी वारीची सुरुवात होईल. त्याअगोदर
सकाळी पाच वाजता महाआरती होईल.
      सोमवार 15 2 2021 सकाळचा नाश्ता व चहा दिलीप पाटील, रवी भोई, श्याम मोहन, हॉटेल पंचवटी लाडू प्रसाद, अरुण साळुंखे, गोपाळ कुंभार, शालीक आधार काटे, भाऊसाहेब पाटील यांच्या वतीने केले जाणार आहे तर दुपारचे जेवण गौरव अंबादास विभुते धुळे, नयना सोनवणे धरणगाव, सचिन शरद भावसार, राजेंद्र भगवान महाले, मनोहर अशोक पाटील, किरण पवार सर वारुडकर, विश्वकर्मा वीज कर्मचारी सहकारी संस्था धरणगाव यांच्याकडून दुपारचे जेवण दिले जाणार आहे तर दुपारचा चहा दिलीप सुरेश पाटील कोळपिंपरी यांच्याकडून दिला जाईल तर रात्रीचा मुक्काम युवराज पाटील, शंकर पवार, भानुदास शिंपी, बालू शर्मा, वन ॲनिलेश बडगुजर, प्रशांत चौधरी पिप्रीं ता.धरणगाव यांच्याकडून सर्व व्यवस्था केली जाणार आहे .
             दिनांक 16 फेब्रुवारी 2021 वार मंगळवारी सकाळचा चहा नास्ता साई गजानन मित्र मंडळ मुसडी, शरद पाटील पाळधी सबस्टेशन, भागवत निळकंठ सोनवणे जळगाव, भगवान पाटील एकलग्न यांच्याकडून तर दुपारचे जेवण भगवान सपकाळे व विजया सपकाळे यांच्याकडून श्री गजानन महाराज मंदिर रामदास कॉलनी सागर पार्क जवळ जळगाव येथे जेवण, तर दुपारचा चहा जितेंद्र पाटील गोदावरी कॉलेज जवळ जळगाव, हेमंत वासुदेव पवार यांच्याकडून चहा तर रात्रीचा मुक्काम जय गजानन ग्रुप आयोध्या नगर जळगाव यांच्याकडून सर्व व्यवस्था लेवा समाज हॉल आठवडे बाजार सुनसगाव फाट्याजवळ नशिराबाद.
              17-2-2021 बुधवारी सकाळचा चहा नाश्ता योगेश विद्याधर मोहरीर जळगाव, यांच्याकडून नास्ता सुनसगाव, चंद्रकांत वसंतराव पाटील पिंगळवाडे, गणेश सूर्यवंशी, काशिनाथ जावरे यांच्याकडून थंडपेय, तर दुपारचे जेवण प्रवीणसिंग खुशालसिंग चौधरी, संजयसिंग चौधरी, खडके तालुका भुसावल, गोकुळ घ्यार मोंढाळा यांच्याकडून जेवण तर दुपारचा चहा अनिल भालेराव संगीता भालेराव यांच्याकडून गोडशेव, चहा तर रात्रीचा मुक्काम सुपडू चौधरी, संगीता चौधरी साळशिंगी यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा साळसिंगी येथे सर्व व्यवस्था.
            दिनांक 18-2-2021 वार गुरूवार सकाळचा चहा व नास्ता वासुदेव पाटील शारदा कॉलनी बोदवड यांच्याकडून  प्रकाश शर्मा यांच्याकडून चहा बोदवड, भगवान लोहार राजूर चहा-नाश्ता ,गजानन कृषी केंद्र एणगावचहा, दुपारचे जेवण निलेशभाऊ करंडे घाणखेडा तालुका बोदवड यांच्याकडून जेवणाची व्यवस्था तर दुपारचा चहा राजेंद्र बागुल, आप्पासाहेब गणेश सुकलाल पाटील, गिरीधरनॲ आप्पा महाळपुर तर रात्रीचा मुक्काम अरुण आढाव (पाटील सर) व श्री के.टी देशमुख गणपती मंदिर नगर 2 बुलढाणा रोड मलकापूर झोपण्याची व्यवस्था माहेश्वरी मंगल कार्यालय मलकापूर येथे आहे.
            दिनांक 19-2-2021 वार शुक्रवार सकाळचा नाश्ता वरच्या अनिल महाले (कान्हा) मलकापूर राजू वाघूड यांच्याकडून चहा, अनिल राजाराम आढाव धानोरा विटाळी यांच्याकडून नाश्ता संदीप शिरोळे नाश्ता तर दुपारचे जेवण राजेंद्र नानाराव देशमुख, प्रदीप देशमुख, सतीश देशमुख, राहणार कोलासर तालुका नांदुरा यांच्याकडून जेवणाची व्यवस्था तर दुपारचा चहा अरुण पवार तामसवाडी तालुका पारोळा यांच्याकडून तर रात्रीचा मुक्काम प्रशांतभाऊ जामोदे ,सुरेखा जामोदे यांच्याकडून भारतीय ज्ञानपीठ विद्यालय नांदुरा येथे सर्व व्यवस्था.
दिनांक 20-2-2021 वार शनिवार सकाळचा चहा व नास्ता वसंतराव पाटील महादेव मंदिर लांजुळ ,अनिल सोमा ठाकूर यांच्याकडून गोडशेव ,तर दुपारचे जेवण विजय मेश्रे, विजय नाफडे अकोला पाईमंदिर जलंब येथे जेवणाची व्यवस्था तर दुपारचा चहा आत्माराम नामदेव पाटील खेरडा ,सुरेश धनगर आणि हंसराज वंजारी यांच्याकडून शेगाव येथे चहा तर  रात्रीचा मुक्काम संजय बाबुराव गुरव (शहनाईपार्टी) डॉ प्रसाद वासुदेव उपासनी शनीमंदिर पैलाड यांच्याकडून सर्व व्यवस्था परशुराम हाँल ब्राह्मण समाज धर्मशाळा शेगाव येथे केलीे आहे तरी पायीवारीतील गजानन भक्तांनी लक्षात घ्यावे.कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्वानी नियमाचे पालन करून पायीवारी शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी करावी असे अध्यक्ष प्रा.पवार यांनी सांगितले आहे.
           सर्व गजानन भक्तांना कळविण्यात येतेकी अमळनेर हुन आठव्यांदा श्री क्षेत्र शेगाव पायी वारी यावर्षी 15 फेब्रुवारी सोमवारी सकाळी पाच वाजता निघणार आहे तरी ज्या भक्तांना वारीत यावयाचे असेल त्यांनी पुढील व्यक्तींशी संपर्क साधून फार्म भरून प्रवेश घ्यावा. पाण्याची व्यवस्था श्री गजानन ग्रुप करणखेडा, विशेषसेवा राणाजी बँड, गणेशभाऊ व रविभाऊ गुरव यांच्याकडून आहे असे वारीप्रमुख आर.बी पवार सर यांनी कळविले आहे .अधिक माहितीसाठी 94 23 90 30 14 व 98 23 26 01 03  या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...