Sunday, 7 February 2021

चला हवा येवू द्या फेम अभिनेते सागर कांरडे, उमेश जगताप यांच्या हस्ते पत्रकार संजय कांबळे यांच्या साॅग पोस्टरचे अनावरण !!

चला हवा येवू द्या फेम अभिनेते सागर कांरडे, उमेश जगताप यांच्या हस्ते पत्रकार संजय कांबळे यांच्या साॅग पोस्टरचे अनावरण !!


कल्याण (प्रतिनिधी) : झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय शो 'चला हवा येवू द्या' मधून घरा घरात पोहचलेले आणि रसिक प्रेक्षकांच्या ह्रदय सिंहासनावर अढळ स्थान निर्माण केलेले सिनेनाट्य अभिनेते सागर कांरडे, तुला पहाते रे, या लोकप्रिय मराठी सिरीयल मधील 'झेंडे' हे पात्र साकारणारे अभिनेते उमेश जगताप, यांच्या हस्ते पत्रकार संजय कांबळे यांच्या एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस, निर्मित मराठी गाण्यांच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले.


गेली २०/३० वर्षे पत्रकार व्यवसायात कार्यरत असलेले कल्याण तालुक्यातील आघाडीचे पत्रकार संजय कांबळे यांनी जनाधार निर्भिड पत्रकार सेवा संस्था या महाराष्ट्र शासन नोंदणीकृत संघटना संचलित एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या संस्थेची स्थापना करुन परिसरातील नवोदित कलाकारांना चमकण्याची संधी उपलब्ध करून दिली. याच माध्यमातून त्यांनी अनेक मराठी गाणी रेकॉर्डिंग व विडिओ शुट करून घेतली आहे. या अल्बमधील एक गाणे 'दिलाय तिघींनी मला धोका' या गाण्याचे पोस्टर चे आज ZEE मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येवू द्या' या कार्यक्रमातील प्रमुख आघाडीचा अभिनेता सागर कांरडे, तसेत याच वाहिनीवरील 'तूला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील "झेंडे" ही व्यक्ती रेखा साकारणारे, तसेच सध्या चला हवा येवू द्या मधून विनोदी अभिनेता म्हणून घराघरात पोहोचलेले अभिनेते उमेश जगताप, यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी अभिनेते सागर कांरडे, उमेश जगताप यांनी टिम प्रमुख संजय कांबळे यांचे विशेष कौतुक केले व पुढील प्रोजेक्ट साठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी या छोटेखानी कार्यक्रमाला नाट्य निमार्ते अजय कासुर्डे, अभिनेते शशी गंगावणे कॅमेरामन संजय घारे, बालकलाकार हिंमाशू कांबळे आणि एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस चे टिम प्रमुख पत्रकार संजय कांबळे आदी उपस्थित होते.
या प्रसंगी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस च्या पुढील प्रोजेक्ट बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आम्हाला तूमच्या टिम च्या पुढील गाण्याची प्रतिक्षा असेल, असे नाट्य निर्माते अजय कासुर्डे यांनी सांगितले. व शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...