Sunday, 7 February 2021

दुचाकी चोरी करणा:या दोन सख्या भावांना डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी केली अटक !!

दुचाकी चोरी करणा:या दोन सख्या भावांना डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी केली अटक !!
 

त्यांच्याकडून" 11 बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी हा चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे".


कल्याण, प्रतिनिधी : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा परिसरात काही दिवसापूर्वी एक बुलेट चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. कल्याण डोंबिवलीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिस चोरांच्या शोधात मानपाडा पोलिस ठाण्याचे एपीआय सूरेश डांबरे यांनी बुलेट चोरीचा प्रकार सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरु केला. या प्रकरणात पोलिसांना माहिती मिळाली की, कल्याण पूव्रेतील चक्कीनाका परिसरात एक युवक आहे. जो सीसीटीव्हीत दिसत आहे. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले. अधिक विचार केली असता धक्कादायक माहिती समोर आली. योगेश महेश भानुशाली आणि त्याचा भाऊ मुकेश भाऩूशाली हे दोघे सख्ये भाऊ आहेत. हे दोघे दुचाकी चोरी करीत होती. त्यांचा साथीदार समीर उर्फ अकरम सय्यद या चोरीत सहभागी होता. कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, एसीरी जे. जी. मोरे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक हरीदादा चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. भानूशाली बंधूंकडून एक दोन नव्हे तर 11 दुचाकी हस्तगत केल्या आहे. त्यात तीन नव्या को:या बुलेट आहेत. या सर्व गाडय़ा ते विकण्याचे तयारीत असताना त्यांच बिंग फुटले. या सख्या भावांनी ठाणो जिल्ह्यात नाही तर नाशीकमध्ये चोरी केली आहे. मुकेश हा जीम ट्रेनर होता. त्याचा भाऊ कोणत्याही दुकानावरकाम करीत होता. त्यांचा मुख्य धंदा दुचाकी चोरीचा होता. पोलिस त्यांचा साथीदार समीरच्या शोधात आहेत.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...