Sunday, 7 February 2021

शेती सोबत दुग्धव्यवसाय करा : डॉ. गुजराथी

शेती सोबत दुग्धव्यवसाय करा : डॉ. गुजराथी
————————————————


"अकुलखेडा येथे रोटरी क्लब चोपडा तर्फे मोफत पशुसंवर्धन शिबिर"

चोपड़ा, वार्ताहर -

शहरातील रोटरी क्लब आणि तालुका लघु पशु वैद्यकिय सर्व चिकित्सालय चोपड़ा विभाग यांच्या संयुक्तपणे अकुलखेडा येथे पशुसंवर्धन शिबीर संपन्न झाले,
शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सहाय्यक आयुक्त डॉ.संजय गुजराथी म्हणाले की, शेतकर्‍यानी आपल्या प्रगतीसाठी शेती सोबतच पशुसंवर्धन व दुधाचा व्यवसाय करावा.
शिबिरात १०२ जनावरांना लाळ खुरगट, ९३ जनावरांचे जंत निर्मूलन, १०३ जनावरांचे गोचिड निर्मुलन, ३७ गायी, म्हशीची गर्भ तपासणी आणि ३७ जनावरांना बिल्ले मारून आधार नोंदणी करण्यात आली.
पशुसंवर्धन शिबीरचे उद्घाटन नवनियुक्त ग्रा.प.सदस्य अनंत नामदेव महाजन यांच्या हस्ते गाईची पूजा करून करण्यात आले, त्यांचे स्वागत रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिराव यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रूपेश पाटील यांनी केले.
डॉ.संजय गुजराथी यांनी आपल्या भाषणात पशुवैद्यकीय विभागातील योजनांचा लाभ पशुपालकांनी घ्यावा असे आवाहन केले, कार्यक्रमात प्रकल्प प्रमुख संजीव गुजराथी,  प्रफुल्ल गुजराथी तसेच रोटरी सदस्य एम डब्लू पाटील, व्ही.एस.पाटील, प्रवीण मिस्त्री, विलास कोष्टी, चंद्रशेखर साखरे, डॉ वैभव पाटील, भालचंद्र पवार, सर्व नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य व गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शिबिर हे सहाय्यक आयुक्त डॉ.संजय गुजराथी यांच्या मार्गदर्शना खाली, पशुधन विकास अधिकारी डॉ प्रिया बागडे, डॉ प्रशांत बर्गे, डॉ वाहेद तडवी, दातीर डी आर, किरण पाटील, विलास साळुंखे, पी डी पाटील, प्रवीण साळवे, विनायक धनगर, पंकज सैदांने, लखीचंद महाजन, गोपाल महाजन, जयराम धनगर, मलिक अफसर, दिलीप नेहते यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !!

भिवंडी आगरी महोत्सवात संपादक डॉ. किशोर पाटील यांचा गौरव !! ठाणे (एस. एल. गुडेकर) : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा आणि सामाजिक...