कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या म्हारळ ग्रामपंचायतीवर भगवा, राष्ट्रवादी काँग्रेसला उपसरपंच पद !!
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या व श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे तर उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी निलेश देशमुख हे निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून भाजपकडून ही सत्ता खेचून आणण्यासाठी या सदस्यांनी किंगमेकर ची भूमिका बजावली आहे आयत्या वेळी काही दगाफटका बसू नये म्हणून सेनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी येथे तळ ठोकला होता.
कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. येथील माजी सरपंच प्रमोद देशमुख हे भाजपकडे सत्ता राखतात की पुन्हा सेना येथे जम बसवते याबाबत अधिक चर्चा सुरू झाली होती. नुकत्याच झालेल्या१७ जागांसाठी निवडणुकीत भाजपाचे श्रीमती नंदा पांडुरंग म्हात्रे, योगेश देशमुख, विकास पवार, प्रमोद देशमुख, अमृता देशमुख, लक्ष्मण कोंगिरे आणि अनिता देशमुख असे ७ सदस्य निवडून आले तर शिवसेनेचे प्रकाश चौधरी, निलिमा म्हात्रे, दिपक आहिरे, मोनिका गायकवाड, मंगला इंगळे, बेबी सांगळे, आणि प्रगती कोंगिरे असे ७ सद्स्य निवडून आले होते. तर साईबाबा पॅनेलचे किशोर वाडेकर, वेदिका गंभीरराव, व अश्विनी देशमुख यांचा विजय झाला होता.
या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने अखेर किंगमेकर म्हणून या ३ सदस्यांवर मोठी भिस्त होती तसे पाहिले तर शिवसेनेकडे ८ सदस्य होते. . मात्र निवडणूकीचा निकाल लागताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे यांनी सुरुवातीपासून या सदस्यांना आपल्या गळाला लावल्याने आवश्यक आकडे जुळवता आले. सकाळी सरपंच व उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळी सरपंच पदासाठी सेनेच्या वतीने केवळ प्रगती प्रकाश कोंगिरे आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी निलेश देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरले तर भाजपचे वतीने उपसरपंच पदासाठी योगेश देशमुख यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी झालेल्या मतमोजणीत उपसरपंच पदी श्रीमती अश्विनी निलेश देशमुख यांचा विजय झाला. त्यांनी भाजपाचे योगेश देशमुख यांचा १० विरुद्ध ७मतांनी पराभव केला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी काम पाहिले तर म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, डॉ सोमनाथ पाटील, मनसेचे विवेक गंभीरराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपसरपंच निलेश देशमुख, म्हारळ पोलीस चौकीचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान म्हारळ ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे, भाजपाच्या हातून एक मोठी ग्रामपंचायत गेली आहे. याचे शल्य सदस्याना आहे.



No comments:
Post a Comment