कल्याण तालुक्यावर शिवसेना आघाडीचे वर्चस्व, तर आपटी मांजर्ली ग्रामपंचायतीवर कित्येक वर्षानंतर भाजपाचे वर्चस्व !!
कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडणूकीत शिवसेना व त्यांच्या मित्र पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारत निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले असून गेल्या २५ वर्षे शिवसेनेची एक हाती सत्ता असलेली आपटी मांजर्ली ग्रामपंचायत मात्र भाजपाने हिसकावून घेतली आहे. तर एकमेव खोणी ग्रामपंचायतीमध्ये कोरम पुर्ण न झाल्याने ही निवडणूक रद्द करण्यात आली आहे.
आज कल्याण तालुक्यातील आपटी मांजर्ली, रायते पिंपळोली, आणे भिसोळ, निंबवली मोस, म्हारळ, वरप, जांभूळ,बापसई, आणि गोवेली या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये रायते पिंपळोली ग्रामपंचायतीवर शिवसेना च्या मयुरी रोहणे, तर उपसरपंच हरेश पवार, म्हारळ सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे (शिवसेना) उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस) वरप, छाया महेंद्र भोईर सरपंच, उपसरपंच निलेश कडू (महाविकास आघाडी) जांभूळ ग्रामपंचायत, सरपंच परीक्षीत पिसाळ, उपसरपंच निता गोरे (राष्ट्रवादी काँग्रेस) बापसई कल्पना टेंभे, सरपंच, उपसरपंच अरुण गायकवाड (शिवसेना) तर भाजपचे निंबवली मोस ग्रामपंचायतीत सरपंच रिया जाधव, उपसरपंच साईनाथ दळवी, आणे भिसोळ ग्रामपंचायतीवर भाजपाचे चंद्रकांत मोहफे, सरपंच तर शिवसेनेचे महेश चोरगे उपसरपंच, गोवेली मध्ये दिपक जाधव सरपंच तर काळूराम घुडे उपसरपंच असे पक्षीय बलाबल असून यातील लक्षवेधी ठरली ती आपटी मांजर्ली ग्रुप ग्रामपंचायत, कारण गेली अनेक वर्षं ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. मात्र यावेळी भाजपने मोठ्या प्रमाणावर येथै ताकत लावली होती. येथे कमलाकर भेरले, वाघू कंकू गंगाराम, करुणा भेरले, गीता शिशवे, संगीता शिशवे, मोहन शिसवे, गणेश फसाले, गायकर जयश्री, आणि मनोहर घारे असे सदस्य निवडून आले होते. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले होते त्यामुळे येथे भाजपाच्या जयश्री गायकर यांची सरपंच तर कमलाकर भेरले यांची उपसरपंच पदी निवड झाली. येथे गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली सेनेची सत्ता संपुष्टात आली.


No comments:
Post a Comment