कृषी विभाग माणगांव मार्फत माणगांव येथे शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री केंद्राचे उदघाटन !!
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : कृषी विभाग माणगाव मार्फत विकल ते पिकेल अभियानांतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री केंद्राचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार राज्यात राबवणे बाबत धोरण निश्चित करण्यात आले आहे या अंतर्गत राज्यातील शेतकरी ते ग्राहक यांना शेतमाल विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील सहकारी भांडार, गृहनिर्माण सोसायटी, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व इतर यंत्रणा योग्य समन्वय साधून शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी योग्य जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, या अभियानांतर्गत माणगाव मधील नितीश अपारमेंट विद्यानगर माणगाव येथे दिनांक ०८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी दहा वाजता शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन माननीय श्री सचिन बोंबलेसाहेब नगरसेवक नगरपंचायत तसेच सौ सुर्वे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री आर, डी पवार यांनी या सोसायटीतील सदस्यांना सांगितले.
या अभियानांतर्गत दलाल कमी करून शेतकरी ते ग्राहक जोडले गेले तर शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल असे सांगितले, गृहनिर्माण सोसायटी पुरवठा करण्यासाठी रामकृष्ण शेतकरी गटाचे अध्यक्ष श्री रामदास जाधव यांची निवड करण्यात आली असून त्यांचे गटामार्फत उत्पादित केलेला चांगल्या प्रतीचे सेंद्रिय भाजीपाला ग्राहकांना पुरवठा करणार असल्याचे सांगितले.
सौ. सुर्वे मॅडम यांनी शेतकऱ्यांना लागणारी सर्व मदत करणार असे सांगितले, यावेळी नितीश अपार्टमेंट अध्यक्ष श्री प्रशांत शेडगे, श्री प्रसाद धारिया, अध्यक्ष भासीन अपार्टमेंट, श्री प्रमोद शिंदे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

No comments:
Post a Comment