जवळ राहत असूनही टोल द्यावा लागतोय ? तर जाणून घ्या किती किमीच्या परिसरासाठी आहे सवलत !!
नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरून (N.H.) चारचाकी वाहने नेताना टोल द्यावा लागतो.
पण अनेकदा जवळ राहत असूनही टोल मागितला जातो.
त्यामुळे अनेकदा वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असतो.
मात्र, तुम्हाला क्वचितच माहिती असेल की किती किमी अंतरावर राहणाऱ्या वाहनचालकांना टोल माफ असतो.
सध्या अनेक टोलनाके कॅशलेस होत आहेत.
कारण या सर्व वाहनांवर फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे कोणत्याही वाहनाला आता रांगेत थांबण्याची गरज नसेल.
जर वाहनावर फास्टॅग नसेल तर टोल टॅक्ससह पेनल्टी आणि दुप्पट टॅक्स वसूल केला जाणार आहे.
तसेच फास्टॅग लावलेल्या वाहनांवर टोलच्या रकमेत काही प्रमाणात सवलत दिली जाणार आहे.
⭕१८ किमीवर राहणाऱ्यांसाठी टोलमध्ये सूट......
अनेकदा टोल प्लाझाच्या परिसरात राहणाऱ्या वाहनचालकांकडूनही टोल आकारला जातो.
पण मेरठच्या टोल प्लाझाच्या मॅनेजरने याबाबत सांगितले, की टोल प्लाझाच्या १० किमीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना त्यांच्या वाहनावर टोल द्यावा लागणार नाही.
अशा वाहनचालकांना टोलमध्ये सूट दिली जाते.
⭕फास्टॅगचा होणार फायदा.....
वाहनावर फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात येत आहे.
या फास्टॅगमुळे वाहनचालकांना फायदा होणार आहे आणि रांगेत गाडी उभी करावी लागणार नाही.

No comments:
Post a Comment