Thursday 25 February 2021

रंगमंच कामगारांवर उपासमारीचे संकट !! अनेक नाटके सुरू न झाल्याचा परिणाम.....

रंगमंच कामगारांवर उपासमारीचे संकट !!

अनेक नाटके सुरू न झाल्याचा परिणाम..... 


मुंबई : नाटकांच्या प्रयोगांना परवानगी मिळाली असली तरीही मर्यादित प्रेक्षकसंख्या, पुन्हा टाळेबंदी होण्याची भीती यामुळे ठरावीक नाटकांचे ठरावीकच प्रयोग सध्या रंगभूमीवर सुरू आहेत. 

नाटक व्यवसायाच्या या कासवगतीमुळे पडद्यामागील कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रंगमंच कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून या कामगारांच्या कुटुंबीयांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. 

टाळेबंदी शिथिलीकरणामध्ये नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाली. मर्यादित प्रेक्षकसंख्येत काही नामवंत कलाकारांची नाटके सुरू ही झाली, मात्र आर्थिक अडचणी, प्रेक्षक न येण्याची भीती यांमुळे मोठ्या प्रमाणावर नाटके अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीत. 
या नाटकांवर पूर्णत: अवलंबून असलेले रंगमंच कामगार भविष्याकडे डोळे लावून बसले आहेत.

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात विविध नाट्यसंस्थांनी रंगमंच कामगारांना आर्थिक आणि इतर प्रकारची मदत केली. त्या आधारावर कसेबसे काही महिने कामगारांनी काढले. त्यानंतर आता नाटकांच्या प्रयोगांसोबत आपला रोजगारही पुन्हा सुरू होईल, अशी आशा त्यांना वाटली; जी खरी होऊ शकली नाही. 

प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, संगीत संयोजक इत्यादी रंगमंच कामगार गेली अनेक वर्षे स्वत:ला झोकू न देऊन रंगभूमीची सेवा करत आहेत. इतर कोणतेही कौशल्य अवगत करण्याची गरज त्यांना कधी जाणवली नव्हती. 
त्यामुळे टाळेबंदीत एकाएकी रोजगार गेल्यानंतर ‘पुढे काय?’ हा प्रशद्ब्रा त्यांच्यासमोर ‘आ’ वासून उभा ठाकला. 

काहींनी भाजीविक्रीसारखे व्यवसाय स्वीकारले आहेत, मात्र त्या क्षेत्राचे आवश्यक तेवढे ज्ञान नसल्याने तिथे फार काळ टिकाव लागण्याची शक्यता नाही.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...