Wednesday, 3 February 2021

मुरबाड तालुक्यातील बहुचर्चित सरपंच पदाचे आरक्षण अखेर जाहिर !!

मुरबाड तालुक्यातील बहुचर्चित सरपंच पदाचे आरक्षण अखेर जाहिर !!


** आरक्षण बदलाने झाला अनेक भावी सरपंचांचा अपेक्षा भंग **             ---


मुरबाड-(मंगल डोंगरे) : 15 डिसेंबर  2020 ला झालेल्या मुरबाड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या  निवडणुका पार पडल्या त्यांनतर १८ डिसेंबरला मतमोजणी घेण्यात आली. परंतु सरपंच पदाचे आरक्षण घोषित नसल्याने गावकुसात शांतता होती .आज अखेर ग्रामपंचायत सरपंच पदाचे  आरक्षण मुरबाड मधिल एम. आय. डी. सी. हाॕल मधे घोषित झाले असून २०२० ते २०२५ या पंचवार्षिक साठी तालुक्यातील खांडपे, शिवळे व उचले या ग्रामपंचायतमधे अनुसूचित जातीचे आरक्षण घोषित झाले असून यातील शिवळे  ग्रामपंचायत मध्ये सरपंच पद हे अनुसूचित महिलेसाठी राखीव आहे. तर अनुसूचित जमाती वर्गासाठी मासले, खानिवरे, व आसोसे या तिन ग्रामपंचायतीचा समावेश झाला आहे. यात खानिवरे व आसोसे येथे अनुसूचित महिला राखीव सरपंच असणार आहे.
                    
उर्वरीत ३८ पैकी १९ ग्रामपंचायतीवर ना.मा.प्रवर्ग आरक्षण असून नढई, मोहोप, कोरावळे, शेलारी, माजगाव, कान्होळ, कान्हार्ले, जांबुर्डे,पाठगाव, कोळठण या १० ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला असतील. व डोंगरन्हावे, शिरवली, कुडवली, देवपे, पवाळे, सरळगाव, असोळे, कळमखांडे, मा.शिरवली अशा ०९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पुरुष आरुढ होणार आहेत. उर्वरीत 46 ग्रामपंचायतीच्या पैकी आंबेळे बु||,शिरगाव, साकुर्ली, न्हावे, किशोर, धानिवली, टेंबरे बु||, कळंभे, करवेळे, आंबेटेंभे, वांजळे, नारीवली, पोटगाव, म्हाडस, चिरड, तोंडली, वाघिवली, नागाव, देवगाव, विढे, भालुक, फणसोली, आगाशी, या ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी तर दहिगाव शे,चिखले,भादाणे, आंबेगाव, बांधिवली, गवाळी, केदुर्ली, डेहनोली, काचकोळी, मोहघर, बोरगाव, खाटेघर, साजई, म्हसा, कोंडेसाखरे, शिदगाव, माल्हेड, नढई, सासणे, भुवन, मानिवली बु||, देहेरी, खांदारे या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. आजच्या या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना बदललेल्या आरक्षणामुळे अनेक भावी सरपंच पदाची स्वप्न पाहणाऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे.तर काही सदस्यांना आरक्षण सोडतीने आशा पल्लवित  झाल्याचे दिसून आले.            

याq आरक्षण सोडतीसाठी उपजिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा सोमाने, मुरबाडचे तहसिलदार अमोल कदम, नायब तहसिलदार प्रसाद पाटिल यांच्या समवेत लहान मुलगी कु.पूर्वी सोनटक्के हिच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...