अखिल महाराष्ट्र सकुळ साळी समाज संस्था. महिला मंडळ व युवक मंडळ यांच्यामार्फत महिला सबलीकरण सक्षमीकरण योजनेअंतर्गत आत्मनिर्भर उद्योजकता उपकरणे वाटप समारंभ संपन्न !!
मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/ श्रीराम वैद्य) :
अखिल महाराष्ट्र सकुळ साळी समाज संस्था. महिला मंडळ व युवक मंडळ यांच्यामार्फत महिला सबलीकरण सक्षमीकरण योजनेअंतर्गत आत्मनिर्भर उद्योजकता उपकरणे वाटप समारंभ कालिदास मॅरेज हॉल मुलुंड पश्चिम याठिकाणी संपन्न झाला. यशवंत जाधव (अध्यक्ष स्थायी समिती बृहन्मुंबई महानगरपालिका) यांच्या मदतीमुळे ज्येष्ठ समाजसेवक भरत मते व सौ अश्विनी ताई भरत मते यांच्या अथक प्रयत्नातून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत गरजू महिलांना त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी सात शिलाई मशीने व दोन घरघंटी तसेच एक एम्ब्रोईडरी मशीन (प्रत्येक जिल्ह्यासाठी फिरते )असे एकूण मिळून ३७ साधने मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली. यशवंत जाधव (अध्यक्ष-स्थायी समिती बृहन्मुंबई महानगरपालिका) व साै.यामिनी जाधव, विधानसभा सदस्य महाराष्ट्र विधानमंडळ यांचे सुपुत्र निखिल जाधव (सिनेट सदस्य,मुंबई विद्यापीठ) यांच्या हस्ते.
तसेच ज्येष्ठ समाजसेवक भरत मते, कवी- साहित्यिक अरुण म्हात्रे, साै.गीता हरवंदे, प्रकाश पोळ यांच्या हस्ते व अध्यक्ष अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संस्था अशोक दांडेकर, अध्यक्षा, अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज महिला मंडळ साै. अश्विनीताई मते, युवा अध्यक्ष विक्रम पाठक, श्रीकांत बडे, तामिळनाडू राज्य महिला अध्यक्षा श्रीमती-विजया एकबोटे, अ.म.स्व.सा.स.संस्था विभागीय उपाध्यक्षा श्रीमती कल्पना शिपुरकर अ.म.स्व.सा.स.संस्था उपाध्यक्षा, साै.शैलजा कासटकर , व विभागीय उपाध्यक्षा, साै.किर्ती दळवी तसेच बहुसंख्य समाज बंधू भगिनींच्या साक्षीने साहित्याचे वाटप करण्यात आले.शिलाई मशीन वाटप दरम्यान लाभार्थी महिलांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दिसत होते. काही भगिनींनी आपले मनोगत व्यक्त करुन श्री व सौ अश्विनी भरत मते कुटुंबीयांचे आभार मानले व आपण-सर्वांसाठी समाज कार्य करण्यासाठी दीर्घायुष्यी होण्यासाठी श्री भगवान जिव्हेश्वर चरणी प्रार्थना केली.
साै.अश्विनीताई भरत मते यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरुण केली व आपल्या भाषणामध्ये सदैव आपले पतिराज भरत मते त्यांचा नेहमी मला पाठिंबा होता आणि या त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी महिला सक्षमीकरण कार्यक्रमाची ऊर्जा त्यांच्याकडून घेतली आणि हा कार्यक्रम मला यशस्वी या ठिकाणी करता आला असे निक्षुन सांगितले.यशवंत जाधव यांनी जी मदत देऊ केली त्याबद्दल जाहीर आभार मानले. अखिल महाराष्ट्र सकुळ साळी समाज संस्था, अध्यक्ष श्री अशोकजी दांडेकर यांनी आपल्या भाषणामध्ये सर्वात प्रथम श्री मते यांनी जी महिला सबली करणाची कल्पना मांडली त्या कल्पनेचा विचार करून अखिल महाराष्ट्र साळी समाज संस्थेच्या माध्यमातून सदर कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले. यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने आपल्या समाज बांधवांचे अनुदान नुकसान झाले होते त्यासाठी अखिल महाराष्ट्रातर्फे तीन ते चार लाखाचा निधी हा गोळा करून वाटण्यात आला तसेच कोकणात देखील अनेक घराचे छप्पर उडून गेले त्यांच्यासाठी अखिल महाराष्ट्र साळी समाज संस्थेच्या मदतीने पाच ते सहा लाखांचा निधी हा कोकणामध्ये वाटण्यात आला. त्याचप्रमाणे कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय गेलेत अनेक लोक बेरोजगार झाले त्यांना मदत मिळावी म्हणून अत्यंत गरजू महिलांना त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी श्री व सौ मते यांच्या अथक प्रयत्नाने मिळालेल्या मदतीमुळे गरजू महिलांना निश्चितच मदत होईल असे सांगून आपले भाषण संपविले.हा कार्यक्रम न भूतो न भविष्यति असा होता. एक नव्हे तब्बल ३७ वस्तूंचे वाटप करण्यात आले व गरिबांचा संसार थाटण्याचा एक प्रयत्न यशस्वी करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक मते यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमासाठी भविष्यात जर श्री जिव्हेश्वर कृपेने आणखी मदत मिळाली तर समस्त अखिल महाराष्ट्रात साधने / शिलाई मशीन गरीब, गरजू महिलांना देण्याचा प्रयत्न केला जाईल याची ग्वाही दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रायगड अविनाश साळी व पदाधिकारी, ठाणे जिल्हा अध्यक्ष विनोद सजगुले व पदाधिकारी तसेच स्थानिक अध्यक्ष, मुंबई विभागीय अध्यक्ष भास्कर चौधरी व पदाधिकारी, रत्नागिरी अध्यक्ष विजय वैद्य व पदाधिकारी रायगड व रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्षा, महिला विभागीय उपाध्यक्ष श्रीमती- कल्पना शिपुरकर, यांची मोलाची मदत झाली.
तसेच श्री चंद्रकांत हावरे, श्री अजित साळी व श्री उदयकुमार साळी यांची विशेष मोलाची मदत या कार्यक्रमात झाली. या कार्यक्रमासाठी श्री.गोपाळराव गायकवाड सहचिटणीस, अ.म.स्व.सा.स. संस्था, रायगड महिला अध्यक्षा साै.श्वेता अंबुर्ले व रत्नागिरी महिला अध्यक्षा साै.स्नेहलता गोंधळेकर व आजी माजी जिल्हा अध्यक्ष आवर्जुन उपस्थित होते. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा फुलगुच्छ,शाल व स्मृती चिन्ह देऊन यथोचित सत्कार अ.म.स्व.सा.स. संस्था व अ.म.स्व.सा.स. महिला मंडळ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संस्थेचे सरचिटणीस श्रीयुत भालचंद्र साळी यांनी सरतेशेवटी उपस्थितांचे व देणगीदारांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचा चोख हिशोब कोषाध्यक्ष श्री. संतोष अंबुर्ले यांनी ठेवला.कार्यक्रमाची सुरुवात उल्हासनगरच्या भगिनी कुमारी श्रृती मोहन केंदुळे यांच्या स्वागत गीताने व कार्यक्रमाची प्रस्तावना साै. कल्पना शिपुरकर यांनी केली तर कार्यक्रमाची सांगता सौ संगीताताई अविनाश साळी यांच्या पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अगदी खुमास शैलीत व शिस्तबद्ध पध्दतीने डॉ. प्रतिक्षा बोर्डे व सौ.मेघना कांबळी यांनी केले.

No comments:
Post a Comment