डॉ. श्री. संजय जाधव अध्यक्ष (एन. के. जाधव. एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट) च्या वतीने कोरोना योद्धा सन्मान व सलाम वसई सेवा संघ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरसह मोफत आरोग्य शिबीर संपन्न !!
नालासोपारा (दिपक मांडवकर/ शांत्ताराम गुडेकर ) :
नालासोपारा येथे जिजाईनगर मोरगाव येथे वाड नं. ३९ चे बहुज विकास आघाडीचे संपर्क प्रमुख डॉ. संजय जाधव एन. के. जाधव. एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कोरोना योद्धा सन्मान व सलाम वसई सेवा संघ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरसह मोफत आरोग्य शिबीर व मोफत डोळे तपासणी शिबिर पार पडले. या कार्यक्रमात मान्यवर म्हणून वसई विरार महानगरपालिका प्रथम महापौर राजीवजी पाटील साहेब, माजी. महापौर रुपेश जाधवजी, सभापती मकवानाजी, नगरसेवक किसन मामा बंदगळेजी, अरुण जधाव, निलेश चौधरी, भूटो समानी, ब्रिजेश यादव, संजय कदम, रमेश चव्हाण, सौ.किरण तिवारी, विनय तिवारी आदी मान्यवर उपस्थिती होते. तर एन. के. जाधव एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट च्या सदस्य सौ. नंदा संजय जाधव, राजेश जाधव, डॉ. रिया संजय जाधव यांनी मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमात शिवसेना पक्षातील ५ माजी शाखा प्रमुखानी वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडी पक्षा मध्ये पक्ष प्रवेश केला.
कोरोना योद्धा म्हणून २६० योद्धा सहभागी झाले होते, त्यात प्रथम डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई दूत, पत्रकार, नगरसेवक, विद्युत मंडळ कर्माची, गॅस कर्मचारी, आशा वर्कर्स, समाज सेवक यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले. तर महारक्तदान शिबिरा साठी ८१ रक्त दातांनी आपले सहयोद दिले. व मोफत आरोग्य व डोळे तपासणी मध्ये १६५ नागरिकांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम नियोजन मंडळाचे सदस्य सोमा गुडेकर, अप्पा सुतार, प्रकाश नाडकर, दीपक हरयाणा, संजय कदम, राजन तळेकर, सागर फाळके, शरद रिंगे, विश्वानाथ रेवाळे, विक्रम राऊत, केतन मांजरेकर, गणपत पवार, संजय वारंग, संतोष नाईक, मनोज शिवतारकर, विलास वारिसे, एकनाथ चौगुले, पत्रकार दीपक मांडवकर यांनी योग्यरित्या पार पाडले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पा सुतार, प्रकाश नाडकर, दिपक मांडवकर यांनी केले. शेवटी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment