राणीची बाग आजपासून खुली....!
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) १५ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी खुले होणार असून सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
तसेच ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि पाच वर्षांखालील मुलांना बागेत न येण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
करोनाकाळात राणीची बाग बंद करण्यात आली होती.
सध्या बाधित रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात येत असल्याने पालिकेने पुन्हा राणीबाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतु संसर्गाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याने नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
⭕नियम काय ?
* वाहनधारकांनी प्रवेशद्वाराजवळ वाहनांच्या चाकांचे निर्जंतुकीकरण करूनच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा.
* तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे. गर्दी करू नये.
* साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद असल्याने सोबत कमीत कमी वस्तू आणाव्यात. खाद्यपदार्थ, प्लास्टिकच्या बाटल्या आणू नयेत.
* प्राणिसंग्रहालयात प्रवेश केल्यावर समूहाने फिरू नये.
प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये.
* प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये.
* मुखपट्टी (मास्क)व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचऱ्याच्या डब्यात टाकावे.
* पिण्याच्या पाण्याची सुविधा प्राणिसंग्रहालयात करण्यात आली आहे.
तेथे पाणी पिण्याआधी हात र्निजतुकीकरण करून घ्यावेत.

No comments:
Post a Comment