अनुशेष भरुन काढण्यासाठी मुरबाडमध्ये नाणार रिफायनरी प्रकल्प स्थलांतरीत करावा प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे मागणी !
मुरबाड (मंगल डोंगरे) :
मंगळवार दि.९ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्याकडे मागील २५ वर्षाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी मुरबाडमध्ये नाणार रिफायनरी प्रकल्प स्थलांतरीत करावा अशा आशयाचे निवेदन काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात देण्यात आले. दि.८ मार्च २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकारच्या २०२१-२०२२ वार्षिक अर्थसंकल्प जाहीर झाला त्यामध्ये मुरबाड तालुक्यासाठी कुठलीही भरीव तरतूद आढळुन आली नाही तसेच मागील २५ वर्षापासुन तालुक्यात कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणुक आली नाही.
त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या प्रमाणात मुरबाड तालुका विकासाच्या बाबतीमध्ये मागास राहील आहे. मुरबाड तालुक्यात रिफायनरीला लागणाऱ्या प्रमुखबाबी मध्ये पाणी साठी २,३४,००० घन किमी क्षमतेचे बारवी धरण, सरळगाव येथे MIDC शेकडो एकर अधिग्रहित करणार आहे तसेच दहावी-उच्चशिक्षित २० ते ३० हजार बेरोजगारांची संख्या आहे. मागील २५-३० वर्षापासुनचा अनुशेष भरुन काढण्यासाठी तसेच तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर व कामगार यांची संख्या मोठ्याप्रमाणत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात घेवुन येण्यासाठी नाणार रिफायनरी प्रकल्प मुरबाड तालुक्यात स्थलांतरीत करावा असे प्रतिपादन यावेळी चेतनसिंह पवार यांनी केले.


No comments:
Post a Comment