Thursday 22 April 2021

आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांमुळे मूरबाडकरांना मिळणार 10 टन प्राणवायू !! **पिकेल तिथे विका; अन्यथा निघा-आँक्सीजन कंपनीला आमदार किसन कथोरे यांचा सज्जड इशारा **

आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांमुळे मूरबाडकरांना मिळणार 10 टन प्राणवायू !!

**पिकेल तिथे विका; अन्यथा निघा-आँक्सीजन कंपनीला आमदार किसन कथोरे यांचा सज्जड इशारा **

**अखेर 10 टन प्राणवायूची मागणी मान्य**


मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोविड सेंटर मध्ये व्हेंटिलेटर सुविधा सुरू करण्याची मागणी वारंवार होत असल्याने  त्यासाठी लागणारा प्राणवायू मुरबाडच्या कंपनीने द्यावा यासाठी आमदार किसन कथोरे यांनी कंपनी व्यवस्थापनाला भेट घेऊन 10 टन प्राणवायू पुरवण्याचे मागणी मंजूर करुन घेतली आहे. 


मुरबाड तालुक्यातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसदिवस वाढ होत आहे. मुरबाड शहरात ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये 50 हुन जास्त रुग्णशय्या वाढविण्याचा विचार सुरू आहे. सध्या 60 ऑक्सिजन सिलेंडर, 2 व्हेंटिलेटर असलेले कोविड सेंटर सुरू केले आहे. त्याच बरोबर कोविड रुग्णांवर व्हेंटिलेटर लावून उपचार व्हावेत. यासाठी तहसीलदारांना वारंवार निवेदने दिली आहेत.  मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दखल घेऊन मुरबाड विधानसभा क्षेत्रातील शासकीय कोविड सेंटर व कोविड वर उपचार करणारे खाजगी दवाखाने यांना लागणारा प्राणवायू मुरबाड औद्योगिक क्षेत्रात उत्पादीत करणाऱ्या प्रँक्झिअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पुरवावा यासाठी कंपनीला पत्र दिले होते. परंतू कंपनीने दुर्लक्ष केल्याने आमदारांनी स्वतः एफडीएचे अधिकारी, तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या समवेत कंपनीस भेट देऊन प्रथम मूरबाडला प्राणवायू द्या, अन्यथा निघा. जिथे पिकते तिथे मिळणार नसेल तर तुमची गरज काय असे ठणकावून सांगितले. त्यामुळे कंपनीने प्रथम मूरबाडला 10 टन प्राणवायू पुरवला जाणार  असल्याची मागणी मान्य केली आहे. परंतू हा प्राणवायू डोंबिवली येथील नोंदणीकृत ठेकेदारामार्फत पुरवला जाणार असल्याने अधिक वेळ जाणार आहे.

  "ऑक्सिजन माझ्या मुरबाडमध्ये तयार होतो नि तो मुरबाडच्या रुग्णांना मिळणार नसेल तर त्याचा काय उपयोग? म्हणून स्वतः प्रथमता कंपनीला भेट देऊन मूरबाडला 10 टन ऑक्सिजन पुरवण्याची मागणी मान्य करायला लावल्याने मुरबाड करांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे".
-

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...