Saturday 24 April 2021

रोटरी क्लब ऑफ़ चोपडा तर्फे 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर मशिन्सचे लोकार्पण !!

रोटरी क्लब ऑफ़ चोपडा तर्फे 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर मशिन्सचे लोकार्पण !!


चोपडा, वार्ताहर : कोरोना महामारीमुळे नागरिक सर्वत्र त्रस्त आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवत आहे. अशावेळी रुग्णांना काहीसा दिलासा देण्यासाठी म्हणून रोटरी क्लब चोपडाने 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन आज 23 एप्रिल 2021 पासून तत्काळ उपलब्ध करून दिले आहे. 
चोपडा शहरातील रुग्णांसाठी अल्पदरात भाडे घेऊन हे सामान्य नागरिकांना घरी मिळू शकणार आहे. जे  कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार काही काळ ऑक्सिजन लागण्याची शक्यता असते अशा रुग्णांना हे काँसंट्रेटर ऑक्सिजन मशीन मिळू शकणार आहे. यावेळी मा. प्रांत शिंदे साहेब व तहसीलदार अनिल गावित साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी रोटरी अध्यक्ष  नितिन अहीरराव, सचिव रुपेश पाटिल, AG पुनम गुजराथी, डॉ ललित चौधरी, एम डब्लू पाटिल, अरुण सपकाले, महेंद्र बोरसे सर, प्रफ्फुल गुजराथी, प्रवीण मिस्त्री, चंद्रशेखर साखरे, सुनील महाजन, अर्प्रित अग्रवाल, पंकज बोरोले, चेतन टाटिया उपस्थित होते.
विजेवर चालणारे हे मशिन हवेतुन आणि पात्रता मधुन ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सक्षम आहे. मिनीटाला 5 ते 10 लिटर्स इतका ऑक्सिजन पुरवठा करता येवू शकतो.सद्यस्थितीत हे मशिन कोरोना रुग्नांसाठी वरदान ठरत आहे.बाहेर वाढलेल्या ऑक्सिजन सिलेंडर च्या किंमती व टंचाई पाहता व वापरण्यास सोपे असल्याने हे मशिन उपयुक्त आहे.
शरिरातील ऑक्सिजन ची पातळी 90% ते 92% च्या खाली आल्यावर ऑक्सिजन सपोर्ट लागतो.डॉक्टरांच्या सल्ल्याने अश्या रुग्णांना ह्या मशिनद्वारे ऑक्सिजन पुरवठा करता येईल. काही रुग्ण कोविड मधुन बरे झाल्या नंतर ही त्यांना कित्येक महिने ऑक्सिजन ची गरज भासते.अशा होम आयसोलेशनच्या रुग्नांसाठी हे मशिन फारच उपयुक्त ठरतं आहे.
गरजु रुग्णांनी यमुनाई हॉस्पिटल,समर्थ पॅलेस समोर,यावल रोड येथील रोटरी क्लब च्या "रुग्ण सेवा" या ऑर्थोपेडिक लायब्ररी येथे मोब.न.80876 71216, 9823355599 वर संपर्क करावा असे आवाहन चोपडा रोटरी क्लब कडून करण्यात आले आहे.

वरील फोटो :- मा.प्रांत शिंदे साहेब, मा.तहसीलदार अनिल गावित साहेब, रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव व रोटरी सदस्य यांच्या उपस्थितीत गरजू रुग्णाच्या नातेवाईकांना मशीन सुपूर्द करतांना.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...