वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाचे डोंबिवली पश्चिम येथे उद्धाटन !!
कल्याण : आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांना सामावून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेब यांना व त्यांच्या विचारांना मानणारा खूप मोठा घटक समाजात आहे. बाळासाहेबांनी कधीही कोणत्याही एका समाजासाठी काम केले नाही, असे आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे लाखो अनुयायी संपूर्ण देशात आहेत.
असेच बाळासाहेबांना मानणाऱ्या डोंबिवली येथील कार्यकर्त्यांनी आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार डोंबिवली पश्चिम मध्ये समाजाला न्याय देण्यासाठी व पक्ष वाढीसाठी डोंबिवली शहर पश्चिम अध्यक्ष गौतम गवई यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे या जनसंपर्क कार्यालयाचा उद्धाटन सोहळा ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत यांच्या हस्ते संपन्न झाला, या कार्यक्रमाला सर्व मान्यवर पदाधिकारी, व कल्याण डोंबिवलीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित जिल्हा कार्यकारिणी व मान्यवर यांनी डोंबिवली शहर पश्चिम अध्यक्ष गौतम गवई व डोंबिवली शहर पश्चिमचे पदाधिकारी व कार्यकर्ते हार्दिक शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment