म्हारळ ग्रामपंचायतीचे कोरोनाच्या विरोधात कडक निर्बंध, दडांत्मक कारवाई चा इशारा !!
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीचे हद्दीत दिवसेंदिवस कोरोना चे रुग वाढत असून वारंवार नागरिकांना अवाहन करुन देखील ते ऐकत नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने लोकांवर कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली असून प्रंसगी दडांत्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे. असे परिपत्रक ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे व ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी काढले आहे.
कल्याण तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्येची ग्रामपंचायत म्हणून म्हारळ ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. त्यामुळे येथे सर्वाधिक काळजी घ्यावी लागते. मागील वर्षी येथे शेकडो कोरोनाचे पेशंट सापडले होते. आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. शेजारच्या कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात हजारो कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. म्हारळ गावातील अनेक नागरिक हे नोकरी काम धंद्या निमित्ताने बाहेर ये या करित असतात. पर्यायाने येथे कोरोनाचे दोन अंकी संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे मागील आठवडय़ात आरोग्य विभागाचे पथक ग्रामपंचायत मध्ये आले होते. त्यांनी ग्रामपंचायत हद्दीतील दुकाने, बाजार, व इतर गर्दी रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने म्हारळ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे, उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख, सर्व सदस्य व ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी हद्दीतील नागरिकांना घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावने बंधनकारक केले असून मास्क नसल्यास २०० रुपये दंड तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानदारांकडून ५०० रु दडांत्मक कारवाई केली जाणार आहे. याशिवाय सायंकाळी ८ नंतर फेरीवाले यांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. म्हणून नागरिकांनी सोशलडिंस्टिंग चे पालन करुन मास्क वापरावे शक्यतो घराबाहेर पडू नये असे अवाहन सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment