Saturday, 15 May 2021

मुंबईतील मातोश्री सेवाधाम ट्रस्टतर्फे रत्नागिरी न.प.च्या कोविड सेंटरला औषधे व संरक्षक सामग्रीचा मदतीचा हात !

मुंबईतील मातोश्री सेवाधाम ट्रस्टतर्फे रत्नागिरी न.प.च्या कोविड सेंटरला औषधे व संरक्षक सामग्रीचा मदतीचा हात !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
             मुंबईतील मातोश्री ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ. मनोज भाऊ चव्हाण यांनी राज्यातील काही कोविड केअर सेंटरना औषधे व संरक्षक सामग्री मदत म्हणून देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी न.प. चे आरोग्य सभापती श्री. निमेशजी नायर व मातोश्री ट्रस्टचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्या विनंती वरून डॉ. मनोज चव्हाण यांनी आज रत्नागिरी नगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर ला रुग्णांसाठी लागणारी औषधांचा संच,पि.पि.ई किट,फेस शिल्ड मास्क, फेस मास्क, ॲप्रन व जंतुनाशके असे साहित्य रत्नागिरीचे नगराध्यक्ष श्री. बंड्या शेठ साळवी, मुख्याधिकारी श्री. ठोंबरे नगरसेवक सुहेल मुकादम आरोग्य विभागाचे अधिकारी भोइर यांच्या उपस्थितीत न. प. आरोग्य विभागाला सुपूर्त केले. याप्रसंगी मातोश्री ट्रस्टतर्फे ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ.मनोज भाऊ चव्हाण, संदीपजी परब, समीर खाडिलकर,अरविंद मालाडकर, बिपिन शिंदे, शैलेश मुकादम, नैनेश कामेरकर, अमोल श्रीनाथ व ट्रस्टचे हितचिंतक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जे,बी. जयंतीलाल जी जैन रोहित पटेल व मिऱ्या चे ग्रामपंचायत सदस्य  अबु भाटकर, हेल्पिंग हॅंड चे रुपेश सावंत, महेंद्र नागवेकर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. डाँ.मनोज चव्हाण यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करत चव्हाण आणि संपुर्ण सहकारी वर्गाचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...