राज्यात दिवसभरात नवीन कोरोनाबाधीत रुग्णसंख्येत कमालीची घट !
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. राज्यात बऱ्याच दिवसांनंतर बाधित रुग्णांचा आकडा 30 हजारांच्या आत आला आहे. आज तब्बल 48 हजार 211 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर आज नवीन 26 हजार 616 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान आज 516 कोरोना रुग्णांची मृत्यू झाला.
आतापर्यंत कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 54,05,068 इतका झाला असून 48,74,582 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 82 हजार 486 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यात 4 लाख 45 हजार 495 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.

No comments:
Post a Comment