Wednesday, 12 May 2021

राज्यात आज ४६ हजार ७८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण ! 'वाढत असलेले मृत्यूचे आकडे चिंतेची बाब'

राज्यात आज ४६ हजार ७८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण !
'वाढत असलेले मृत्यूचे आकडे चिंतेची बाब'


मुंबई : देशासह राज्यात कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेने हैदोस घातला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येचा ताण राज्यातील आरोग्य यंत्रणेला सहन करावा लागत आहे. यात राज्यात आज ४६ हजार ७८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८१६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. राज्यात आज ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या आता ५ लाख ४६ हजार १२९ वर पोहोचली आहे.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...