Saturday, 15 May 2021

राज्यात दिवसभरात रुग्णसंख्येत घट ! पण मृत्यूचा आकडे चिंतेची बाब !!

राज्यात दिवसभरात रुग्णसंख्येत घट ! पण मृत्यूचा आकडे चिंतेची बाब !!


मुंबई : महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू कोरोना रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून आली. अगदी दिवसाला जवळजवळ 70 हजार रुग्ण अशी ही संख्या पोहोचली होती. मात्र आता त्यामध्ये घट होताना दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 34,848 नवीन कोरोना विषाणू रुग्णांची व 960 मृत्यूंची नोंद झाली आहे. अशाप्रकारे राज्यातील एकूण प्रकरणांची संख्या 53,44,063 झाली असून, मृतांचा आकडा 80,512 वर गेला आहे.

राज्यामध्ये आज 59,073 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आतापर्यंत 47,67,053 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 4,94,032 सक्रीय प्रकरणे आहेत.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...