Thursday 27 May 2021

परप्रांतीय नागरिकांचे लोंढे राज्यात पुन्हा लागले परतू !!

परप्रांतीय नागरिकांचे लोंढे राज्यात पुन्हा लागले परतू !!


ठाणे : कोरोनाची पहिली लाट ओसरताच गावी गेलेले परप्रांतीय कामानिमित्ताने पुन्हा महाराष्ट्रात (मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, इ.) दिशेने परतू लागले. काही महिने हाताला काम मिळते ना मिळते तोच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होऊन आपले हाल होतील या भीतीने आधीच परप्रांतीयांनी पुन्हा गावची वाट धरली; परंतु आता कोरोनाची दुसरी लाटही काही प्रमाणात ओसरू लागली आहे. त्यामुळे आता परप्रांतीयांचे लोंढे महाराष्ट्रात (मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, इ.) दिशेने येऊ लागले आहेत; परंतु कोरोना चाचणीपासून लपण्यासाठी अनेकांनी रेल्वे स्टेशन किंवा इतर ठिकाणांहून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला होता. अशातच मागील काही दिवसांत परप्रांतीय येण्याची संख्या वाढू लागल्याने राज्यात महापालिका व राज्य शासनाकडून स्टेशन परिसरात अँटिजन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. स्टेशनवर उतरल्या उतरल्या अशा नागरिकांना हेरून त्यांची चाचणी सुरू झाली आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात चाचणी करून घेण्यासाठी काही दिवसांपासून रांगा वाढल्याचे चित्र दिसत आहे.

फक्त ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात २० मे ते २६ मे दरम्यान ठामपाच्या माध्यमातून स्टेशन परिसरात पाच हजार ७३५ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ५७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. 

असाच धोका संपूर्ण राज्यात असल्याने व परत महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी इतर राज्यांतून येणाऱ्या नागरिकांनी आधी कोरोना चाचणी करावी, मगच राज्यात प्रवेश करावा, असे आवाहन आता राज्य शासनाकडून केले आहे.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...