राज्यात दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त ! पण मृत्यूदर कमी होत नाही !!
मुंबई : राज्यात बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा खाली येऊ लागला आहे. त्यामुळे राज्यासाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात २८ हजार ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी ५२ हजार ८९८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
त्यामुळे राज्यातील अशा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ४९ लाख २७ हजार ४८० इतका झाला असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.६९ टक्क्यांवर गेला आहेेेे. दरम्यान, एकीकडे रिकव्हरी रेट हळूहळू वाढत असताना राज्यातला मृत्यूदर मात्र कमी होत नाहीये. तसेच, मृतांचा आकडा देखील अजूनही मोठाच आहे. आरोग्यविभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात मंगळवारी ६७९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे, राज्यातील एकूण मृतांचा आकडा ८३ हजार ७७७ इतका झाला आहे. तसेच मृत्यूदर देखील १.५४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment