जिल्हा परिषदेतील क्लार्क २० हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात !
पुणे - बिल काढण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी करून त्यातील २० हजार रुपये स्वीकारताना पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील क्लार्कला २० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
विजय मधुकर चितोडे (वय ४५) असे रंगेहात पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विजय चितोडे हे पुणे जिल्हा परिषद येथे क्लार्क आहेत. सध्या त्यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा चार्ज आहे.
तक्रारदार यांच्या कंपनीला पोस्ट कोविड 19 चे फॉर्म व ऊस तोडणी कामगार आरोग्य तपासणी पत्रिका छापण्याचे काम मिळाले आहे. या कामाचे बिल काढण्यासाठी विजय चितोडे याने २५ हजाराची लाच मागितली होती.
दरम्यान, तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली. लाचलुचपत विभागाने याची खातरजमा केल्यानंतर लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर यातील २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना विजय चीतोळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

No comments:
Post a Comment