Tuesday 29 June 2021

पतीच्या हृदयविकाराच्या उपचारासाठी धावनाऱ्या बारामतीच्या लता करे आजींचा इंडियन आयडॉल मध्ये गौरव, सोनू कक्करने केली 1 लाखांची मदत !

पतीच्या हृदयविकाराच्या उपचारासाठी धावनाऱ्या 
बारामतीच्या लता करे आजींचा इंडियन आयडॉल मध्ये गौरव, सोनू कक्करने केली 1 लाखांची मदत !


अरुण पाटील, भिवंडी, दिं.19 :
       बारामती येथील लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक पताकावला होता.
           लता करे आजी यांनी मॅरेथॉन स्पर्धा जिंकून अवघ्या महाराष्ट्राला आपली दखल घेण्यास भाग पाडले. पण, त्यामागील त्यांचा संघर्ष सर्वांच्या मनाला स्पर्श करून गेला. नुकताच लता करे यांनी  इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा संघर्ष ऐकून गायिका सोनू कक्कर यांनी 1 लाख 21 हजार  रूपयांची आर्थिक मदत दिली.
       बारामती येथील लता करे 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या होत्या. लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदय विकारावरील उपचारा साठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. बारामतीमधील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना त्यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले. पतीच्या उपचारासाठी वयाच्या 64 व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र त्यांचे मोठे कौतुक झाले.
         त्यानंतर सलग 3 वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली. पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढण्यात आला आहे. 'लता भगवान करे, एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
        इंडीयन आयडॉल हा गाण्याच्या रिॲलिटी शोमध्ये देशभरातून स्पर्धक सहभागी झाले असून या मध्ये गायिका सोनू कक्कर, हिमेश रेशमिया,अनु मलिक जज्ज म्हणून काम पाहत आहे. तर आदित्य नारायण कार्यक्रमाचे होस्ट म्हणून काम पाहत आहेत.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...