शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची निवड !
शिर्डी - आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या साईबाबा संस्थान देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी राज्यात अनेकांचा डोळा होता. देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केला होता.
मात्र काल महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला शिर्डी संस्थान आले आहे तर काँग्रेसकडे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट. यानंतर शांत, संयमी, अभ्यासु कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांची निवड त्यांनी अत्यंत कमी वयात पक्षात दाखवलेली विश्वासार्हता बघुन पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी करून ही जबाबदारी सोपवली आहे. त्यांची निवड झाल्याची बातमी समजताच कोपरगाव तालुक्यात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी करुन जल्लोष साजरा केला.

No comments:
Post a Comment