Friday, 4 June 2021

आमदार किसन कथोरे यांनी भूमिपूजन केलेले मोहिली पावशेपाडा पोहच रस्त्याचे काम रखडणार?

आमदार किसन कथोरे यांनी भूमिपूजन केलेले मोहिली पावशेपाडा पोहच रस्त्याचे काम रखडणार?


कल्याण, (संजय कांबळे) : शहापूर पडघा टिटवाळा अशा छोट्या मोठ्या शहरातून कल्याण, अंबरनाथ, बदलापूर उल्हासनगर अशा मोठ्या शहरांमध्ये येण्याजाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या मोहिली पावशेपाडा पोहच रस्त्याचे भूमिपूजन कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते दोन तीन आठवड्यापूर्वी झाले होते. यावेळी काम वेळेत पूर्ण होईल का? तरच मी नारळ फोडतो असे आ कथोरे यांनी मिश्किल पणे ठेकेदाराला म्हटले होते. परंतु आता सुरू होणारा पाऊस, शेतकऱ्यांची पेरणी यामुळे अडवला जाणारा रस्ता हे पाहता पुलांचे काम रखडणार असे दिसते.


आ किसन कथोरे हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना मोहने वाशियांनी मोहिली पावशेपाडा असा रस्ता व्हावा अशी मागणी केली होती. यावेळी कथोरे यांनी नाबार्ड २३ अंतर्गत सुमारे ५कोटी रुपये या पुलासाठी मंजूर करून घेतले होते मोहिली बाजूकडून पुलांच्या बांधकामाला सुरुवात केली. ७गाळ्याचा पुल पुर्ण झाला. परंतु पावशेपाडा बाजूला एका सिंधी  व्यापा-याची खाजगी जागा असल्याने व हा रस्ता त्याच्या जागेतून जात असल्याने त्यांनी या विरोधात तहसीलदार पासून ते राष्ट्रपती पर्यत तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे हे काम काही महिने रखडले होते तसेच आ कथोरे यांचा मतदारसंघ बदलाला असल्याने त्यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु पुन्हा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोहच रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये निधी मंजूर केला. त्याचे भूमिपूजन दोन तीन आठवड्यापूर्वी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते झाले होते. यावेळी या कामाचे ठेकेदार उपस्थित होते. तेव्हा काम वेळेत पूर्ण होईल का? तरच मी भूमिपूजन करतो असे ते म्हणाले होते. याप्रसंगी ठेकेदाराने होकारार्थी मान हलवली होती. हे काम पूर्ण होण्यासाठी १२  महिण्याची मुदत असूव १२०० मीटर लांबीचा रस्ता आहे यामुळे टिटवाळा, शहापूर, पडघा, तसेच आजूबाजूच्या १०/२० गावांना कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत म्हारळ, वरप, कांबा येथे येणेजाणे फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे हा पोहत रस्ता महत्त्वाचा मानला जातो.


परंतु आता एक दोन दिवसात पावसाळा सुरू होणार आहे हा रस्ता उल्हास नदीच्या काठावरून असल्याने तसेच पुढील मुख्य रस्त्याला म्हणजे कल्याण - मुरबाड महामार्गाला जोडणारा काही भाग हा पावसाळ्यात बुडत असल्याने हे काम कसे करणार हा प्रश्न आहे. शिवाय आता पावशेपाडा येथील शेतकरी शेतीच्या कामांना सुरुवात करतील, बांधबंदिस्ती, पेरणी यामुळे ठेकेदार पुलापर्यंत साहित्याची ने आण कसे करणार, पेरणी नंतर कापणी. आणि नंतर कामाला सुरुवात? अशातच हा सर्व परिसर गाळ, माती चा असल्याने पावसाळ्यात चिखलात गाड्या फसू शकतात.
आजच याची प्रत्यक्षात पाहणी केली असता पुलाजवळ मोठा खड्डा खणला आहे. तोही पाण्याने भरला आहे. येथे काम बंद असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या वाटेवर काटे टाकले असल्याचेही दिसले. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता मोहिली पावशेपाडा पुलाचे काम पुढील काही महिनेतरी रखडणार ऐवढे नक्की! 

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...