Tuesday, 22 June 2021

उदयनराजे सेना प्रतिष्ठानची पत्रकारांशी बांधिलकी पत्रकारांना छत्री, माक्स व सॅनिटायझरचे वाटप !

उदयनराजे सेना प्रतिष्ठानची पत्रकारांशी बांधिलकी
पत्रकारांना छत्री, माक्स व सॅनिटायझरचे वाटप !


टिटवाळा, प्रतिनिधि :- उदयनराजे सेना प्रतिष्ठान आणि बाळकडू पत्रकार संघटना यांच्या वतीने उदयनराजे सेना प्रतिष्ठानचे सदस्य श्रीकांत चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवारी कल्याण गेस्ट हाऊस येथे अनेक पत्रकारांना छत्री सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. 


पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत परंतु ज्या परीने पत्रकरांना सहकार्य व्हायला हवे ते होत नाही. परंतू बाळकडू पत्रकार संघटना यासाठी कार्य करण्यासाठी पुढे सरसावली आहे. याच उद्देशाने मंगळवारी उदयनराजे सेना प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारांना छत्री सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. 


या प्रसंगी उदयनराजे सेना प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सागर तवले, आसनगावचे सरपंच जालिंदर तळपाडे, जगन ठाकरे, विशाल मिरकुटे, सोमनाथ पवार, सदानंद वाकूले, निकेश वाकूले, एकनाथ भोईर, भरत जाधव, अवि मगर, अनिकेत मिरकुटे आदी सदस्य उपस्थित होते. 

यावेळी कल्याण डोंबिवली व ग्रामीण भागातीलतील अनेक पत्रकारांना छत्री सॅनीटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच लवकरच धान्य किट व इतर वस्तूंचे वाटप देखील संघटनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे आणि असेच विविध उपक्रम यापुढे ही सतत राबवणार असल्याचे उदयनराजे सेना प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सागर तवले व बाळकडू पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश जाधव यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...