कल्याण, (संजय कांबळे) : भविष्यात निर्माण होणा-या अंबरनाथ, कुळगांव आणि बदलापूर महानगरपालिकेत शेजारील कल्याण तालुक्यातील म्हारळ आणि वरप या गावाचां समावेश करण्यात आला असून याला नुकतिच शासनाने मंजूरी दिली आहे, परतू आम्हांला ही महानगर पालिका नको एकतर आमची ग्रामपंचायतच ठेवा अथवा या गावाची मिळून एक नगरपंचायत तयार करा, अशी मागणी करत पालिकेत गावे घेण्यास म्हारळ ग्रामस्थांनी प्रखर विरोध केला असून तसे निवेदन आमदार किसन कथोरे यांना एका शिष्टमंडळाव्दारे देण्यात आले आहे, यावेळी ही गावे कोणत्याही महापालिकेत जाऊ देणार नाही असे आश्वासन आ कथोरे यांनी ग्रामस्थांना दिले आहे,त्यामुळे भविष्यात हे अंदोलन पेटणार असे दिसत आहे.
महानगरपालिका, नगरपालिका भाग वगळून उर्वरीत एम एम आरडी मधील ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी पूर्वी प्लँन तयार करण्यात आला होता, यातून यांची एक महानगर पालिका निर्माण करण्यात यावी असा विचार पुढे येऊन प्रस्ताव २०१६ मध्ये प्रसिध्द झाला होता,याबाबतीत लोकांचा सूचना व तक्रारी २०१७ मध्ये मागविण्यात आल्या होत्या, त्या नुसार यू पी एस मदान या वरीष्ठ अधिका-याच्या नेतृत्वाखाली एका समितीने शासनास प्रस्ताव सादर केला होता, यामध्ये अंबरनाथ कुळगांव बदलापूर अशी नवीन महानगरपालिका तयार करुन यामध्ये शेजारील अंबरनाथ तालुक्यातील चामटोली चाफे व राहटोली आणि कल्याण तालुक्यातील म्हारळ, म्हारळ खुर्द, म्हारळ बुद्रूक आणि वरप अशी ४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत आणि या प्रस्तावाला शासनाने नुकतिच मंजूरी दिली आहे.मात्र यालाच ग्रामस्थांचा विरोध आहे.
कल्याण तालुक्यातील म्हारळ गावाची तर खूपच वाईट परिस्थिती आहे, कारण या गावाचे रेशनिंग आफिस उल्हासनगर मध्ये, स्मशान उल्हासनगर मध्ये, महसुली कामे कल्याण तालुक्यात, पोलिस ठाणे टिटवाळा येथे आणि विधानसभा उल्हासनगरमध्ये ! येथील नागरिकांची मोठी बिकट अवस्था निर्माण होते, त्यामुळे तत्कालीन माझी सरपंच प्रमोद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ठराव घेण्यात आला होता की एक तर आमची स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था च असावी किंवा म्हारळ वरप, कांबा या तिन गावांची क दर्जाची नगरपंचायत तयार करावी अशी मागणी व ठराव करण्यात आला होता. परंतू शासनाने याकडे सोईस्कर दुर्लश करुन या गावांचा अंबरनाथ कुळगांव बदलापूर महानगरपालिकेत समाशेव केल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला.
त्यामुळे मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आ किसन कथोरे यांना म्हारळ गावातील ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले, यामध्ये म्हारळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रमोद देशमुख,माजी उपसभापती पांडूरग म्हात्रे, कल्याण पंचायत समितीच्या माजी सभापती रंजना देशमुख, पचायत समिती सदस्या अस्मिता जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण तालुका उपाध्यक्ष, प्रवीण देशमुख, म्हारळ ग्रामपंचायत सदस्य, योगेश देशमुख, विकास पवार, अमृता देशमुख, नंदा म्हात्रे, अनिता देशमुख,समाजसेवक महेश देशमुख, केतन पवार, मा ग्रामपंयात सदस्य जितू देशमुख, महेश खोत, अनिल पवार आदिचा समावेश होता.
यावेळी कोणत्याही परिस्थितीत ही गावे संभाव्य अंबरनाथ कुळगाव बदलापूर महानगरपालिकेत जाऊ देणार नाही असे आश्वासन आमदार कथोरे यांनी शिष्टमंडळास देऊन मी ग्रामस्थांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, असाही विश्वास आमदारांनी ग्रामस्थांना दिला, त्यामुळे ग्रामस्थांचा उत्साह वाढला असून भविष्यात हे अंदोलन पेटणार असेच दिसते, या बाबतीत म्हारळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रमोद देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, शासनाचा हा अन्यायकारक निर्णय आहे, आम्हांला कोणत्याही द्ष्टीने ही महानगर पालिका सोईची नाही,उलट त्रासदायक आहे, त्यामुळे आमची ग्रामपचायतच बरी किंवा एकतर तिन्ही गावांची एक नगरपंचायत असावी, असे न झाल्यास आमचा विरोध कायम राहिल.

No comments:
Post a Comment