Tuesday, 29 June 2021

नवमतदारांनी e-EPIC मतदार ओळखपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन !

नवमतदारांनी e-EPIC मतदार ओळखपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : भारत निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान ओळखपत्र त्यांच्या मोबाइलवर डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. मतदार पोर्टल किंवा मतदार हेल्पलाइन मोबाइल ॲप किंवा NVSP वरून नवीन मतदार हे e-EPIC डाउनलोड करू शकतात. संबंधित मतदारांनी ते डाऊनलोड करणे अपेक्षित आहे. 
      रायगड जिल्ह्यातील 12 हजार 832 नवीन मतदारांपैकी आतापर्यंत 4 हजार 366 मतदारांनी E-epic डाऊनलोड करून घेतले आहेत. उर्वरित 8 हजार 466 मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करून घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. 
     ही प्रक्रिया सहजपणे पूर्ण करता येते. शिवाय e-EPIC हे मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये किंवा digi locker मध्येही ठेवता येते. ते गहाळ किंवा खराब होण्याचा प्रश्न उदभवत नाही. मतदारांना आपले e-EPIC मतदार पोर्टल: 

http://voterportal.eci.gov.in/  किंवा एनव्हीएसपी: https://nvsp.in/ किंवा मतदार 

हेल्पलाईन मोबाइल ॲप Android -https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen  

iOS -  https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004 
याद्वारे डाऊनलोड करता येणार आहे. 

       या सुविधेत आपले e-EPIC मोबाईल / डेस्कटॉपवर डाउनलोड करण्यायोग्य असून डिजिटली मोबाईलवर संग्रहित करता येते. हे स्वतः मुद्रण (print) करण्यायोग्य आहे तसेच प्रतिमा आणि लोकसंख्याशास्त्रासह सुरक्षित QR कोड उपलब्ध आहे.
     e-EPIC डाऊनलोड करण्याची प्रक्रिया Register Login on NVSP/ Voter Portal, EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक नमूद करणे, नोंदणीकृत मोबाईलवर पाठविलेला OTP तपासून घेणे, e-Epic डाउनलोड करणे अशा प्रकारे आहे.
     या सुविधेची कार्यपद्धती एक व्यक्ती एक मोबाईल नंबर असलेले मतदार हे मतदार हेल्पलाईन App किंवा मतदार पोर्टलवर किंवा स्वतःच्या मोबाइल क्रमांकाने नोंदणी करून e-EPIC डाउनलोड करून घेऊ शकतात, अशी आहे.
माहे डिसेंबर 2020 व दि. 15 जानेवारी 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या नवमतदारांनी वर नमूद केलेल्या माध्यमांद्वारे e-Epic आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी  श्रीमती निधी चौधरी तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती वैशाली माने यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...