Thursday, 22 July 2021

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेतर्फे मदतीचा हात ! "प्रत्येक कठीण प्रसंगात गरजवंताच्या मदतीला तत्पर"

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेतर्फे मदतीचा हात !

"प्रत्येक कठीण प्रसंगात गरजवंताच्या मदतीला तत्पर"
 

कल्याण, प्रतिनिधि : कल्याण येथील समाजसेवक, कामगार नेते मिलिंदनगर येथील रहिवाशी "नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे" संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील व त्यांचे सहकारी गेले दिड वर्ष जेव्हापासून  कोरोनाचे संकट आले तेव्हापासून प्रभागातील, शहरातील नागरिकांच्या मदतीला धान्य वाटप, भाजीपाला, फळे वाटप, अन्नदान, वह्या वाटप, इतर गरज असेल त्या प्रमाणे शक्य असेल ती मदत करत असतात. 


आता नुकतिच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना रविवार पासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांत पुराचे पाणी जाऊन नागरिकांचे खूप नुकसान झाले.


संस्थेचे सर्व सभासद यांनी एकत्र येऊन भर पावसात कोणतेही राजकारण न करता सामाजिक वसा डोळ्यासमोर ठेवुन संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील यांनी आज असाच पूरग्रस्त, कल्याण येथील प्रभाग क्रमांक १६, त्रिमूर्ती कॉलनी येथे त्यांना मदत म्हणून एक छोटासा मदतीचा हात शंभरच्या वरील घरांना दुध, बिस्किटांचे वाटप करून केला. यावेळी शिवसेनेचे शाखाप्रमुख अशोक भोईर, संस्थेचे सहकारी सचिन बुटाला, सचिन भोईर, गणेश पाटील, ओमकार भोईर, उन्मय पाटील, यज्ञेश पाटील, भूषण कोनकर, रोहित कोनकर हे सोबत होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...