Thursday, 22 July 2021

कुमारी धनश्री काशीराम पालकर एस एस सी बोर्ड परीक्षेत ९६ . ६०% गुण मिळवून प्रथम क्रमांकावर !

कुमारी धनश्री काशीराम पालकर एस एस सी बोर्ड परीक्षेत ९६ . ६०% गुण मिळवून प्रथम क्रमांकावर !


     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुक्यातील जावळी गावातील कुमारी धनश्री काशीराम पालकर ही माणगांव एस एस निकम हायस्कूलची विद्यार्थिनीने नुकतेच लागलेल्या एस एस सी बोर्डाच्या परीक्षा निकालात ९६.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. 


     धनश्री काशीराम पालकर या माणगाव तालुक्याच्या जावळी गावातील विद्यार्थिनीने एस एस सी बोर्डाच्या एप्रिल २०२१ रोजी झालेल्या परीक्षेत विषय निहाय इंग्रजी विषयात ९५, मराठी विषयात ९१, हिंदी विषयात ९४, गणित विषयात ९९, सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये ९६ आणि सोशल सायन्स मध्ये ९६ या प्रमाणे ९६.६०% टक्के गुण संपादन करून घवघवीत यश संपादन केल्या मुळे तीचे आई वडील नातेवाईक व गावकरी आणि माणगांव तालुक्यातून तिचे कौतुक होत असून तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. 
     तिच्या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजू पालकर यांनी तिचे हार्दिक अभिनंदन करून तिच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...