Thursday, 22 July 2021

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाने उडवला हाहाकार ! " कल्याण शहरात पूर सदृश परिस्थिती"

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाने उडवला हाहाकार ! " कल्याण शहरात पूर सदृश परिस्थिती"

ठाणे : रविवारपासून सुरू झालेल्या पावसाने कालही संपूर्ण ठाणे जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्याची दाणादाण उडाली आहे. कल्याण-डोंबिवलीत अतिवृष्टी झाल्याने वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. उल्हास नदीला पूर आला आहे. बदलापूरमध्येही पूरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन तत्परतेने पावले उचलली आहेत.



कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासात १७७ मिली मीटर पाऊस पडला आहे. ही अतिवृष्टी आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काही झोपडपट्टी परिसरातही पाणी साचले आहे. नागरिकांची इतरत्र राहण्याची व्यवस्था केली जात आहे. कल्याण शहराला लागून असलेल्या सखल भागात रात्री पासून पाणी भरले आहे. अनेक भागात दहा फुटांवर पाणी भरले असून तळमजला, चाळी पाण्यात गेल्या असून प्रशासनाने तातडीने पावले उचलत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवली आहे. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांना मदत केली जात आहे. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते अशा वेळी मतभेद विसरून तत्परतेने नागरिकांना मदत करताना दिसत आहेत.



त्यासाठी लोलाईन एरियातील नागरीकांना स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे, आमची यंत्रणा अतिशय तत्पर आहे. अशी माहिती कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

अतिवृष्टीमुळे कल्याणच्या वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेतील वालधूनी, अशोकनगर, शिवाजी नगर, भवानीशंकर, त्रिमूर्ती कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे या परिसरातील शेकडो लोकांना इतरत्रं हलविण्यात आलं आहे.



कल्याण-डोंबिवलीत सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रात्री जोरदार पावसामुळे टिटवाळा-कल्याण या मुख्य रस्त्यावर कल्याणी येथे रस्त्याचा काही भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.


No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...