Sunday 25 July 2021

महामारीमुळे मुलांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम ! देशात वयाच्या दहाव्या वर्षापासून मुले सोशल मीडियावर सक्रिय !

महामारीमुळे मुलांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम ! देशात वयाच्या दहाव्या वर्षापासून मुले सोशल मीडियावर सक्रिय !


दिल्ली : नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) ने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबविलेल्या लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापरावर अभ्यास केला आहे.

यात असे आढळले की, 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलेदेखील सोशल मीडियावर सक्रिय आहेत.
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सच्या अभ्यासानुसार, देशात दहा वर्षांखालील 37.8% मुलांचे फेसबुक अकाउंट आहे. समान वयोगटातील 24.3 टक्के मुले इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत. एनसीपीसीआरचे म्हणणे आहे की, हे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तयार केलेल्या निकषांच्या अगदी विरोधात आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खाते उघडण्याचे किमान वय 13 वर्षे वयोमर्यादेची अट आहे.

एनसीपीसीआरने केलेल्या अभ्यासानुसार  बर्‍याच मुलांना त्यांच्या पालकांच्या मोबाइल फोनद्वारे सोशल मीडिया आणि इंटरनेटवर एंट्री मिळते. या अभ्यासामध्ये एकूण 5,811 जणांचा समावेश होता. यामध्ये 3,491 मुले, 1534 पालक, 786 शिक्षक आणि 60 शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
सर्वेक्षणात असे सांगितले गेले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बर्‍याच प्रकारचे कंटेंट आहेत, त्यापैकी बर्‍याच मुलांसाठी ते योग्य नाहीत. म्हणूनच यासंदर्भात योग्य निरीक्षण व कठोर नियमांची आवश्यकता आहे.

सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना असे वाटते की, साथीच्या आजारामुळे त्यांचे शिक्षण प्रभावित झाले आहे आणि ऑनलाईन शिक्षण पुरेसे नसून ते चांगल्या पद्धतीने होतही नाहीये.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...