Tuesday, 6 July 2021

वसईच्या समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू !

वसईच्या समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू !


वसई : वसईच्या सुरुची बाग परिसरात सहलीला गेलेल्या दोन मुलांचा समुद्रात पोहताना बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. नालासोपारा येथील संतोषभुवन परिसरात राहणारे अजित महिपाल विश्वकर्मा (१३) आणि रंजित शिवकुमार विश्वकर्मा (२०) हे नातेवाईकांसोबत वसई पाचूबंदर येथील सुरुची बाग येथे सहलीला गेले होते. दुपारी २ च्या सुमारास अजित आणि रंजित हे दोघेही पोहण्यासाठी समुद्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल समुद्रात गेले आणि बुडाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.  सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांचे मृतदेह  किनाऱ्यावर दिसले. वसई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सध्या सागर किनारी करोनामुळे बंदी आदेश लागू आहे, तरीही आडमार्गाने पर्यटक पोहोचतात.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...