माणगांव तालुका प्रेस क्लब कडून ॲड. राजीव साबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुक्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, सहकार इत्यादी क्षेत्रात ज्यांनी आपल्या अलौकिक कार्याचा ठसा उमटवला आहे. तसेच या क्षेत्रात ज्यांनी भरीव कामगिरी केली आहे असे गोर गरीबांचे तारणहार, माणगांव करांच्या सुख दुःखात नेहमी अग्रणी असणारे माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिक्षण प्रेमी,माणगांव चे शिक्षण सम्राट जेष्ठ विधीज्ञ ॲड. राजीव साबळे यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवार दिनांक ०७ जुलै रोजी माणगांव तालुका प्रेस क्लब चे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री संतोष सुतार, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, कार्याध्यक्ष गौतम जाधव, संघटक पद्माकर उभारे, सचिव हरेश मोरे, खजिनदार सचिन वनारसे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment