Tuesday 27 July 2021

अखेर आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ,वरप गावांना दिली भेट, अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदारांचा पुढाकार !

अखेर आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ,वरप गावांना दिली भेट, अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदारांचा पुढाकार !


कल्याण, (संजय कांबळे) : गेली अनेक वर्षे उल्हास नगर विधानसभा मतदारसंघात असलेल्या म्हारळ, वरप,कांबा या तीन गावांकडे दुर्लक्ष केलेले आमदार कुमार आयलानी यांनी आज अखेरीस म्हारळ, वरप  या गावाचे  मंडळांचे अध्यक्ष योगेश देशमुख यांच्या प्रयत्नाने या गावांना भेट देऊन येथील अडचणी, समस्या, व प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या, यावेळी त्यांचेबरोबरोबर कल्याण तहसीलदार दिपक आकडे, तलाठी श्रीमतीअमृता बडगुजर, कल्याण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा ही तिन गावे आहेत, गेल्या दिडदोन वर्षात कोरोनाकाळात किंवा पुराच्या वेळी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार कुमार आयलानी यांनी या गावाकडे दुर्लक्ष केले होते, त्यामुळे ग्रामस्थांनमध्ये कमालीचा रोष आहे, आमदार दुर्लक्ष करित असल्याने स्थानिक कार्यकर्ते देखील नाराज होते, त्यांची मोठी अडचण व्हायची, तरीही ते त्यांच्या पातळीवर लोकांचे प्रश्न सोडवित होते.


आता गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हारळ, वरप,कांबा या गावातील अनेक भागात पाणी भरुन लोकांचे नुकसान झाले आहे, तसेच एम एम आरडीने बांधलेला रस्ता, अर्धवट राहिलेली कामे यामुळे म्हारळ गावात सखल भागात पाणी भरले होते, त्यामुळे लोकप्रतिनिधी नी आपली विचारपूस, चौकशी करावी असे या परिसरातील नांगरिकांना वाटत होते, हे ओळखून या विभागाचे मंडळ  अध्यक्ष योगेश देशमुख यांनी आमदार कुमार आयलानी यांनी या गावांना भेट देण्याची विंनती केली. 

त्यानुसार आज आमदार कुमार आयलानी यांनी प्रथम म्हारळ गावात भेट दिली, यावेळी समाजसेवक महेश देशमुख यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रंसगी, व्यापारी मंडळी नी आमदार यांना निवेदन दिले, तर महेश देशमुख यांनी एम एम आरडीचे भोंगळ कारभारा विषयी लक्ष वेधले, तसेच एम एस बी, पोलीस ठाण्याबाबत अडचणी मांडल्या, मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी शिवाणींगर, राऊतचाळ, गोदावरी नगर, राधाकृष्ण नगरी,आण्णासाहेब पाटील नगर,बोडके चाळ,आदी भागातील नांगरीकांच्या अडचणी आमदार महोदया समोर मांडल्या, तर माजी सरपंच प्रमोद देशमुख यांनी लसीकरणा बाबतीत प्रश्न उपस्थित केला.

गावातील लोकांचे पुराच्या पाण्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी तहसीलदारांकडे करण्यात आली, त्यांनी देखील तशा सूचना तलाठी अमृता बडगुजर यांना दिल्या, त्यामुळे लोकांमध्ये समाधान पसरले.

यांनतर आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ गावाच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यांची पाहणी केली,म्हारळ सोसायटी, सोनी लाँज जवळील नाला,ट्रू व्हाँली समोरील मुख्य नाला यांची पाहणी केली, व पाणी तुंबण्यांची कारणे जाणून घेतली,यावर उपाय म्हणून सर्व विभागांचे प्रमुख, तसेच ग्रामपंचायत यांची एक मिंटिंग आयोजित करून एक प्लॅन तयार करावा, असा निर्णय घेण्यात आला.

आमदार कुमार आयलानी यांचा म्हारळ दौरा आटोपल्यावर, वरप ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली, यावेळी कचरा टाकण्याच्या जागेचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला, यावर तहसीलदार दिपक आकडे यांनी या तीन गावांचा हा मोठा प्रश्न आहे, भविष्यात तो अडचणी चा ठरणार आहे, त्यामुळे कांबा गावातील सरकारी जागा शोधा ,या तिन्ही ग्रामपंचायतीचे ठराव घ्या, मी व आमदार महोदय आम्ही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर याची भेट घेऊन हा प्रश्न कायचा निकाली काढतो असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले.यावेळी म्हारळ येथील पाहणी दौऱ्यात माझी सभापती, रंजना देशमुख, जिप सदस्या वैशाली शिंदे,वृशाली शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद देशमुख, योगेश देशमुख, समाजसेवक महेश देशमुख जितू देशमुख,महेश खोत, सदस्या अमृता देशमुख अस्मिता जाधव,,, विकास पवार, आदी मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...