Saturday 31 July 2021

चिमुकल्यांना हवा मदतीचा हात: सोशल मिडियावरील अवाहानला तरुणाचा प्रतिसाद !

चिमुकल्यांना हवा मदतीचा हात: सोशल मिडियावरील अवाहानला तरुणाचा प्रतिसाद !


विक्रमगड, अमोल सांबरे (वार्ताहर) : एखाद्या कुटुंबातील कर्ता, कमावता पुरुष अचानक निधन पावला गेल्यावर त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या मुलांचा आधार तुटतो. प्रसंगी त्या कुटुंबाची वाताहत होत असते. अशा कुटुंबाला वेळीतच सावरून आधार आणि मदतीची गरज असते. त्यांना धीर देणे, मदतीचा आधार देणारे समाजातील कोणीच पुढे येत नाही, त्यावेळी असे कुटुंबातील मुलांची दुर्दशा होते. अशी अवस्था चिमणी-पाखर या मराठी चित्रपटातील कथा प्रेक्षकाच्या मनाला चटका लावून गेली. तशीच घटना विक्रमगड तालुक्यातील मुहु रडेपाडा येथे घडली आहे.


   एका कुटुंबाची जबाबदारी असलेल्या घरातील कर्ता असलेला रवींद्र लहाणु रडे या कर्ता पुरुषाचा पाच वर्षापूर्वी मृत्यू झाला, त्यातच आई ही काही वर्षापुर्वी अचानक सोडून गेलेली. अशा अवस्थेत घरात कुणीही कर्ता आणि जबाबदार व्यक्ती नसल्याने दोन लहांग्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
1) रुपेश रवींद्र रडे -वय-14,
2)रोहन रवींद्र रडे- वय-7,
अशी ही चिमुकल्यांची नावे आहेत.

   वडिलांचे पाच वर्षा पुर्वी निधन झाले, त्याचे वडील रवींद्र लहाणु रडे हे मोलमजुरीचे काम करून या चिमुकल्यांची जबाबदारी व देखभाल करत संसाराचा गाड़ा हाकत चिमुकल्याना शिक्षण देत होते. परतुं पाच वर्षांपुर्वी वडीलांचे निधन झाल्याने व त्यातच पतीचे निधन झाल्यानंतर आई ही मानसिक ताणावातुन चिमुकल्यांना सोडून गेल्याने हे चिमुकली आता उघड़यावर पडली आहेत.  या चिमुकल्यांमध्ये कुणीही कमावता नसल्याने पुढील उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

   घरात आजोबा आहेत, त्यांचे वय ७० वर्ष असल्याने ते ही पूर्णतः थकुन गेल्याने मोलमजुरी करू शकत नाहीत.  तात्पुरता स्वरूपात शेजारी असलेले देखभाल करत असुन. या अनाथांच्या करूण कहाणीची चर्चा सध्या विक्रमगड तालुक्यातील महिला वर्गात सुरु असुन चिमुकल्याची कहाणी ऐकुन अनेकांची हृदय पिलवटुन टाकत आहेत. 

    रवींद्र लहानु रडे हा कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ते मोल-मजुरी करून उदरनिर्वाह चालवत होते. या कुटुंबात कोणी कर्ता नसल्याने या कुटुंबाची वाताहत सुरू झाली आहे. त्यातच लहान वयात मुलांचे शिक्षण आणि इतर खर्चासाठी मोलमजुरी शिवाय कोणताच पर्याय उरला नाही..

सोशल मिडियाचा आवाहनाला तरुणांचा प्रतिसाद: -
     घरात कर्ता कोणी नसल्याने कुटुंबाची वाताहत झाल्याने चिमुकल्याना मदतीची गरज असल्याचे ओळखून आणि आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भूमिकेतून शेजारीच राहणारे योगेश रडे या तरुणाने सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील ओंदे गावातील "विक्रांत युवा मित्र मंडळाच्या" तरुणांनी त्यांचा ग्रुप सदस्य रोहित सांबरे याचा वाढदिवस साजरा न करता त्या रक्कमेतुन तातडीने त्यांना एक महीने पुरेल एवढे धान्य, जीवनाश्मक वस्तु डाळ, तांदूळ, तेल, साखर, चहा-पावडर, कडधान्य, अशा अन्य वस्तुंची मदत करत त्यांना सुपुर्द केले.
 या वेळी संजय भगत, रंजित सांबरे, सिद्धार्थ सांबरे, अक्षय सांबरे, विक्रांत सांबरे, सौरभ सांबरे यांनी "विक्रांत युवा मित्र मंडळाच्या" माध्यमातून हा मदतीचा हात देण्यात आला. 
          
ज्ञानाचा दीप उजळावा व पुढील भविष्यासाठी मदतीची गरज:
       प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचा दिवा पेटल्याशिवाय अज्ञान आणि गरिबीचा अंधार दूर होत नाही. अशा वेळी कुटुंबाचा आधार असलेले मजुरी करुन कुटुंबाचा गुजराना करणारे वडिल निधन पावल्याने व त्यातच जवळचे नातेवाईक नसल्याने शेजारीच त्यांचे देखभाल करत आहेत.
1) रुपेश रवींद्र रडे -वय-14,
2)रोहन रवींद्र रडे- वय-7
या लाहांग्याच्या शिक्षणाचा व पुढील भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असुन यासाठी समोर उभ्या असणाऱ्या आर्थिक अडचणींचा डोंगर पार करण्यासाठी त्याना दानशूर व सामाजिक कार्यकर्त्यांचा आधार हवा आहे. एका आशेचा, ज्ञानाचा दीप उजळावा, व पुढील भविष्यासाठी या अनाथ लहांग्याना मदतीची गरज आहे. या अनाथ व निराधार विद्यार्थ्यांना मदत करायची असेल तर "विक्रांत युवा मित्र मंडळाचे" सिद्धार्थ सांबरे-  9765825454 व अमोल सांबरे-9270266696 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विक्रमगड वार्ताहर-अमोल सांबरे

फोटो-1) सोशल मिडियाच्या आवाहनाला प्रतिसाद देत "विक्रांत युवा मित्र मंडळाच्या" तरुणानी त्यांचा ग्रुप सदस्य रोहित सांबरे याचा वाढदिवस साजरा न करता त्या रकमेची अनाथ चिमुकल्याना मदत करताना विक्रांत युवा मित्र मंडळाचे सदस्य

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...