मुंबई, ठाणे, रायगड परिसरात शनिवारपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता !
पुणे : राज्यात मान्सूनचे आगमन होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून मुंबईतील किमान तापमानात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, मुंबईकरांची घामाच्या धारांपासून आता मुक्तता होऊ शकेल. पुढील काही दिवसांत पाऊस पुन्हा जोर धरणार असल्याचे संकेत हवामान खात्याने (IMD) दिले आहेत.येत्या शनिवार आणि रविवारसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई व ठाण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर रायगडसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी पश्चिम-मध्य आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा टप्पा तयार होण्याची शक्यता असल्याने पाऊस पुन्हा जोर धरू शकेल.

No comments:
Post a Comment