Wednesday, 7 July 2021

राज्यात रुग्णसंख्येत वाढ ! मृत्यूदर २.०२ टक्के !

राज्यात रुग्णसंख्येत वाढ ! मृत्यूदर २.०२ टक्के !


मुंबई :  राज्यात आज दिवसभरात नवीन कोरोनाबाधित रुग्ण बरे हेणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ०८ हजार ८९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९६.०५ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ०९ हजार ५५८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

तर, याच कालावधीत १४७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ०८ हजार ८९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ८१ हजार १६७ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख १४ हजार ६२५ आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...