Wednesday, 7 July 2021

कल्याण तालुक्यात २३ ग्रामपंचायत तसेच ५५ गावे कोरोना मुक्त घोषित !

कल्याण तालुक्यात २३ ग्रामपंचायत तसेच ५५ गावे कोरोना मुक्त घोषित !


कल्याण, संजय कांबळे : कल्याण तालुक्यातील ग्रामीण परिसरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव संपुष्टात येण्यास सुरुवात झाली असुन मागील २८ दिवसापासूनच्या केलेल्या सर्वेक्षणात कल्याण पंचायत समितीच्या वैद्यकीय विभागाने ४६ ग्रामपंचायतींपैकी २३ तर ८९ गावांपैकी ५५ गावे कोरोना मुक्त झाल्याची अधिकृत माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत माशाळ यांनी दिली आहे.

कोरोना संसर्गात कल्याण-डोंबिवलीतील शहरी भागाला हजारो संख्येने बाधित करून मृत्यूच्या आकड्याने सर्वसामान्यांना भयभीत करून टाकले होते . कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोना ने शिरकाव केल्याने बाधित रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने गाव खेड्यातील नागरिक भयभीत झाले होते. कल्याण तहसिलदार दिपक आकडे व वैद्यकीय सेवेने देखील ग्रामीण भागात पसणाऱ्या कोरोनावर विविध उपाययोजना आमलात आणून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. यामुळे ग्रामीण भागात कोरोना मृत्यूचे प्रमाणही अत्यल्प होते.

कल्याण तालुक्यातील अनेक विभागात लसीकरणाची मोहीम राबवित कडक लाॅकडावुनचे निर्बंध राबविल्याने नागरिकांना विनाकारण भटकण्यास मनाई आदेश लागू केला होता. यामुळे ग्रामीण भागातील कोरोनावर  मात करण्यात आली होती. मागील २८ दिवसांच्या सर्वेक्षणामध्ये कल्याण पंचायत समितीच्या वैद्यकीय विभागाने ४६ ग्रामपंचायती मधून २३ ग्रामपंचायती कोरोना मुक्त तसेच ८९ गावांपैकी ५५ गावे कोरोना मुक्त झाल्याचे अधिकृत जाहीर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने घेसर, काटई, पिंपरी, राया ,सांगोडा, निंबवली, फळेगाव, उशिद, पळसोली, गेरसे, वेहळे, दहागाव, पोई, वाहोली, दहिवली, कुंदा, केळणी कोलम, चवरे, नांदप, राहन, बापसई, रायता ,जांभूळ या ग्रामपंचायती कोरोना मुक्त झाल्या असुन तर ५५ गावांमध्ये गेल्या महिन्याभरात एकही बाधित रुग्ण सापडला नसल्याची माहिती गटविकास अधिकारी श्वेता पालवे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.भारत माशाळ यांनी दिली आहे.

ग्रामीण भागातील अद्यापही ३४ गावे तसेच २३ ग्रामपंचायती  कोरोना मुक्त झाले नसल्याची उपलब्ध माहिती आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...