Tuesday, 3 August 2021

पाटण तालुका क्रिकेट असोसिशन ने जोपासली सामाजिक बांधिलकी !

पाटण तालुका क्रिकेट असोसिशन ने जोपासली सामाजिक बांधिलकी !


मुंबई, (केतन भोज) : पावसाच्या अतीवृष्टीमुळे चिपळुणसह पाटण तालुक्यातील काही गावांमध्ये पुरस्थितीमुळे खुप नुकसान झाले आहे या पुरपरिस्थितीतील नागरिकांना आधार देण्यासाठी प्रविण वंडुस्कर (महाराज) यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या भावनिक मॅसेज ला सर्व खेळाडूंनी दाद दिली आणि मदतीचा हात पुढे केला.त्याचबरोबर जिद्दी मराठा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री.विनोद कदम (स्वामी) यांनी ही या उपक्रमाला बहुमूल्य अशी साथ दिली ते पाटण तालुका क्रिकेट असोसिशनच्या अध्यक्ष या पदावर देखील कार्यरत आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोशियेशन च्या माध्यमातून पाटण तालुक्यात आलेल्या महापुरामुळे भीषण संकट ओढवलेल्या बाधित कुटुंबाना त्यांच्याद्वारे जीवनावश्यक वस्तुंची मदत केली गेली. त्यामध्ये आंबेघर, साईनगर, कोयनानगर जिंती, जितकरवाडी, धनावडेवाडी, शिंदेवाडी, जोशेवाडी इतर अन्य गावात त्यांच्यामार्फत मदत पोहचवण्यात आली. सर्व नागरिकांनी "पाटण तालुका क्रिकेट असोशिएशन" तसेच "जिद्दी मराठा प्रतिष्ठाण" चे अध्यक्ष विनोद कदम (स्वामी) यांचे आभार मानले. शासनाची अद्याप कोणतीच मदत या गावांना पोहोचलेली नाही. तसेच नेते मंडळी फक्त पाहणी करुन जात आहेत यामध्ये त्वरीत शासनाने लक्ष केंद्रीत करुन या सर्व गावांना मदत लवकर जाहीर करावी अस जिद्दी मराठा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विनोद कदम (स्वामी) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...