Tuesday, 3 August 2021

पत्रकार उत्तम तांबे यांच्या मातोश्री सोनीबाई पांडुरंग तांबे यांचे वृद्धापकाळाने निधन !

पत्रकार उत्तम तांबे यांच्या मातोश्री सोनीबाई पांडुरंग तांबे यांचे वृद्धापकाळाने निधन !


     बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : माणगांव प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष, विद्यमान सल्लागार तसेच बौद्धजन पंचायत समिती तालुका माणगांव चे माजी अध्यक्ष पत्रकार उत्तम पांडुरंग तांबे यांच्या मातोश्री सोनीबाई पांडुरंग तांबे यांचे सोमवार दिनांक ०२ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांच्या राहत्या घरी खांदाड माणगांव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव  यांच्या सुनबाई आणि नातवंडे असा परिवार आहे. 
       सोनीबाई पांडुरंग तांबे या  तत्कालीन आंबेडकरी चळवळीतील खंद्या महिला कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण तांबे परिवार आणि खांदाड बौद्धजन सेवा संघात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. 
     त्यांच्या पार्थिवावर माणगांव खांदाड जवळ असलेल्या स्मशानभूमीत बौद्ध धम्म संस्कार पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
      त्यांच्या अंत्य दर्शनासाठी माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समितीचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र मोरे, सचिव आर डी साळवी, बौद्धजन पंचायत समिती रायगड जिल्हा चिटणीस किर्तीराज शिर्के, शाखा क्रमांक १ चे अध्यक्ष प्रशांत गायकवाड, मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधिज्ञ अॅड नरेश जाधव, मा. नगराध्यक्ष आनंद शेठ यादव, मा नगराध्यक्षा योगिता चव्हाण, गणेश चव्हाण, केतन गायकवाड ओंकार भजनी मंडळाचे माजी अध्यक्ष, चंद्रप्रकाश गोडबोले, संजय गोडबोले, विवेक गोडबोले, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी माणगांव तालुका अध्यक्षा नंदा गोडबोले, रायगड भूषण भाई नामदेव कासारे, पंकज तांबे, शिवदास जाधव, रणजित मोहिते, विनोद मोरे, बंडू मोरे, मोहन जाधव, अतिश सोनावळे, नंदू पवार, पारधे, पत्रकार संतोष सुतार,पद्माकर उभारे, गौतम जाधव, विश्वास गायकवाड, माणगांव तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या विभाग शाखांचे पदाधिकारी आणि तांबे कुटुंबियांचे आप्तेष्ट, सगे, सोयरे आणि नातेवाईक उपस्थित होते. त्यांचा जलदान विधी आणि लोकसभा कार्यक्रम शनिवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२१ रोजी खरे मंगल कार्यालय माणगांव बामणोली रोड येथे सकाळी ११: ३० वाजता कोविड १९ पार्श्वभूमीवरील सर्व नियमांचे पालन करून करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...