Friday, 6 August 2021

लोकलवर विचार सुरू, संयम सोडू नका-- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.!

लोकलवर विचार सुरू, संयम सोडू नका-- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.!


अरुण पाटील (कोपर), भिवंडी, दिं.6.:
            मुंबई लोकल  कधी सुरू होणार? हा प्रश्न सगळेच जण विचारत आहेत. या प्रश्नावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मोठं उत्तर दिले आहे. लोकल वर विचार सुरू असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. लोकलबाबत जबाबदारीचं भान ठेवूनच हा निर्णय घेतला जाईल, संयम सोडू नका असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
            प्रत्येक ठिकाणी रुग्णसंख्या वेगवेगळ्या पद्धतीने आहे. लोकल वर विचार सुरू आहे. राज्यातल्या इतर शहरात शिथिलता देणार आहोत. पण जबाबदारी बाळगून देणार आहोत. संयम सोडू नका, कोणी दुष्मन वा कोणी जवळचा नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
        मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. कृपया संयम सोडू नका. कोणी दुष्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.
        काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली असून इतर गोष्टींमध्येही शिथिलता मिळेल. मात्र जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचं भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...