Saturday 28 August 2021

मुंबईतील आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीच्या घरात सापडलं घबाड; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई.!!

मुंबईतील आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीच्या घरात सापडलं घबाड; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई.!!



भिवंडी, दिं,28, अरुण पाटील (कोपर) :
           मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत या कारवाई अंतर्गत मुंबईतील आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या वर्षी 24 मे रोजी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड याला मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली होती.
           या नथू राठोडच्या चौकशीत त्याच्या उत्पन्ना पेक्षा तब्बल 555 टक्के जास्त इतकी संपत्ती आढळली असून ही संपत्ती ३ कोटी ४९ लाख ९ हजार ३८४ इतकी आहे. कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 या कलमाखाली नथू राठोड याला अटक करण्यात आली होती. गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत तक्रारदाराचे घराची दुरुस्ती करिता परवानगी मिळवण्यासाठी तक्रारदाराने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता पण अनेक दिवस त्याला परवानगी नाकारली जात होती. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी आरे नथू राठोड यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान तक्रारदार याला त्याच्या घराच्या दुरुस्ती करता परवानगी देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आरे नथू राठोड यांनी मंजुरी देण्याचे कबूल केले. मात्र त्याआधी मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांनी त्यांच्या कार्यालयात असलेल्या अरविंद तिवारी या शिपाईची भेट घेण्यास सांगितले.
            अरविंद तिवारी याने नथू राठोड यांच्या वतीने तक्रारदाराला एक लाख रुपये लाच मागितली आणि त्यानंतर तडजोडी अन ती ५० हजार रुपये लाचेची रक्कम देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराला ही रक्कम द्यायची नसल्याने तक्रारदाराने नथू राठोड यांच्यासंबंधी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली या तक्रारीची शहानिशा करण्याकरता मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला या अनुषंगाने वरळी दूध डेरी येथे अरविंद तिवारी याने तक्रारदाराला भेटायला बोलावले होते. त्यानुसार तक्रारदार एसीबीच्या सांगण्याने वरळी दूध डेरी येथे गेला आणि तेथे अरविंद तिवारी याला ५० हजार रुपये लाचेची रक्कम घेताना २४ मे २०२१ या दिवशी रंगेहात अटक केली होती.
           या प्रकरणी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी चौकशी केली असता अशाच पद्धतीने आरे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड याने भरपूर काळी माया जमवलेली आहे, असं मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्यांच्या सुत्रांमार्फत कळालं असून याआधारे मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या घरी धाड टाकली असता या धाडीत तब्बल 3 कोटी 46 लाख दहा हजार रुपये रोख रक्कम नथू राठोड यांच्या घरी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केली होती. ही सर्व रक्कम नथू राठोड याने कशी कमवली आणि कोणाकडून लाच घेतली त्याचबरोबर कोणत्या कामाकरता लाच घेतली होती, या सर्व बाबींची मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे.
         आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड याचे अधिक चौकशी केली जात असून नथू राठोड याची उघड उघड चौकशी झाली असून आता नथू राठोड यांच्या आणखी संपत्तीची चौकशी देखील मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...