Tuesday, 3 August 2021

ब्रेक द चेन अंतर्गत कल्याण डोंबिवलीत आजपासून निर्बंध शिथील !

ब्रेक द चेन अंतर्गत कल्याण डोंबिवलीत आजपासून निर्बंध शिथील !



कल्याण, रशीद शेख : ब्रेक द चेन अंतर्गत कल्याण डोंबिवलीत निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेने याबाबत निर्णय घेतला आहे. दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. इतके दिवस कल्याण डोंबिवलीत लेव्हल थ्रीचे निर्बंध लागू होते. आता निर्बंध शिथील करण्यातचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हिड रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील कोव्हिड परिस्थितीचा आढावा घेत निर्बंध शिथील झाल्याचे आदेश जारी केले. त्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानेही मग जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या आदेशानुसार केडीएमसी क्षेत्रासाठीचे नविन नियमांचे आदेश काढले.

आजपासून म्हणजेच 3 ऑगस्टपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार असून असून शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत ते लागू राहणार आहेत.

कल्याण डोंबिवलीत असे असतील नवे नियम :-

अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री 10 पर्यंत सुरू राहतील.

अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील आणि रविवारी बंद राहतील.

शॉपिंग मॉल्स पूर्णतः बंद राहतील.

रेस्तराँ आणि हॉटेल्स सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील, रविवारी पूर्ण वेळ बंद राहतील, या दरम्यान पार्सल सेवा सुरू राहील.

व्यायामशाळा, योगा क्लासेस, सलुन, ब्युटी पार्लर आणि स्पा 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शनिवार रात्री 10 पर्यंत सुरू राहतील आणि रविवारी बंद राहतील.

सार्वजनिक मैदाने आणि उद्याने केवळ व्यायाम, चालणे, धावणे, आणि सायकलिंगसाठी सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.

सर्व धार्मिक स्थळे मात्र बंद राहतील.

चित्रीकरण हे दिलेल्या वेळेनुसार सुरू राहील.

उपनगरीय लोकल बाबत मुंबई महानगरपालिकेने दिलेले आदेश लागू राहतील, म्हणजेच लोकल प्रवेश बंद राहील.

लग्न समारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत तर अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीत करता येईल.

सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू राहील मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही.

सर्व सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स बंदच राहतील.

सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयं 100% क्षमतेने सुरू राहतील.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...