Tuesday, 3 August 2021

अतिवृष्टीच्या काळात ग्रामसेवकांच्या बदल्या, इतर तालुक्याचा समतोल राखण्याच्या नादात, कल्याणात असमतोल ?

अतिवृष्टीच्या काळात ग्रामसेवकांच्या बदल्या, इतर तालुक्याचा समतोल राखण्याच्या नादात, कल्याणात असमतोल ?


कल्याण, (संजय कांबळे) : २२जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यातील शेतीसह लोकांचे संसार वाहून गेले, हा पुर इतका भंयकर होता की खडवली, रायते दहागाव येथील पुलांचे काही भाग वाहून जाऊन या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांना शासनाच्या मदतीची, आधाराची गरज वाटत आहे, अशा वेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे आहे, नेमक्या अशा अडचणीच्या वेळी जिल्हा परिषदेने ग्रामसेवकांच्या 'बदल्या'चा गोंधळ घातल्याने पुरग्रस्त मदतीपासून वंचित राहतात की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेवटी ऐवढ्या गोंधळानंतरही इतर तालुक्याचा समतोल राखण्याच्या प्रयत्नात कल्याण तालुका मात्र असमतोल झाला आहे.


मागील आठवड्यात म्हणजे २२ जुलै रोजी कल्याण परिसरात तूफान अतिवृष्टी झाली, यामुळे उल्हास, भारवी, काळू आणि बारवी नद्याना पूर आला, यामुळे सखल भागात पाणी भरुण मोठे नुकसान झाले, म्हारळ, वरप, कांबा, रायते, खडवली यासह सर्व ठिकाणी अतोनात नुकसान झाले होते, संसार उपयोगी साहित्यासह, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशावेळी शासनाकडून मदतीची अपेक्षा नागरिकांना आहे, याकरिता पंचनामे होणे गरजेचे आहे,घराच्या पंचनाम्याबाबत तलाठी यांनी गावोगावी भेटी देऊन सामूहिक पंचनामे केले, पण भात शेतीच्या पंचनाम्याकरिता तलाठी, ग्रामसेवक व कृषीसाहाय्यक, यांनी संयुक्त पंचनामा करायचा आहे, तश्या आँडरी तहसीलदार कल्याण यांनी काढल्या आहेत, नुकसानीचा पंचनामा, आपदग्रस्ताचा जबाब, घरपट्टी, आधारकार्ड, संमती पत्र, बँकेचा तपशील, ७/१२ उतारे, सामाईक असल्याह त्यांचे समंतीपत्र, अशी सर्व माहिती भरुन तलाठी, ग्रामसेवक व कृषीसहाय्यक यांनी स्वाक्षरी करुन आपल्या प्रमुखांच्या सहीसह सादर करायचे आहे.साधारणपणे तालुक्यातील ११८ गावांचे पंचनामे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. काही ठिकाणी ते झाले आहेत तर काही ठिकाणी सुरू आहेत.

नेमक्या या अशा अडचणी च्या वेळी जिल्हा परिषदेला ग्रामसेवकांच्या बदल्यांचा 'वारु,उधळायचा होता, जिल्ह्यातील भिंवडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण या पाच तालुक्यातील प्रशासकीय, विंनत्या आणि समुपदेशन बदल्यांचा गोंधळ घातला, त्यातच इतर तालुक्यांंचा समतोल राखण्याच्या नादात कल्याण तालुका मात्र असमतोल  केला.

येथील ४६ ग्रामपंचायतीच्या २०ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या अनत्र्य बदल्या केल्या तर केवळ १० ग्रामसेवक इतर तालुक्यातून कल्याण ला आले त्यामुळे इतर ग्रामपंचायती रिक्त ठेवायच्या का?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कल्याण तालुक्यात २९ तलाठी आणि केवळ ७ कृषीसहाय्यक आहेत, त्यामुळे ऐवढे कृषीसाहाय्यक या तालुक्याला पुरेसे पढणार आहेत का? त्यामुळे सर्व भिस्त ही ग्रामसेवकावर येवून पडलीय, आणि त्यांचीच बदली झाल्याने  आताभातशेतीचे पंचनामे कसे होणार?

त्यातच बदली झालेले ग्रामसेवक चार्ज घेण्यासाठी व देण्यात तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारत आहेत, ते ग्रामपंचायतीला कधी जाणार?विशेष म्हणजे इतर तालुक्यातील लोकप्रतिनिधी, व पदाधिकाऱ्यांनी आप आपल्या तालुक्याचा बदल्यांचा समतोल राखला पण कल्याण चा असमतोल झाला, आता तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व प्रशासन कल्याण तालुक्याचा बिघडलेला असमतोल कसा राखतात की आहे त्यावरचं समाधान मानतात हे लवकरच कळेल.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...