Saturday 28 August 2021

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात आढळली १४ मुले कोरोना पाँझिटिव्ह !!

उल्हासनगर येथील बालसुधारगृहात आढळली १४ मुले कोरोना पाँझिटिव्ह !!


कल्याण : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून धक्कादायक माहिती समोर आली आहे. उल्हासनगर येथील बालसुधारगृहात शिक्षा भोगत असलेल्या १४ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. घटनेनंतर बालसुधारगृहात एकच खळबळ माजली आहे. यामध्ये ४ मुले अपंग आहेत. महापालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये संबंधित मुले कोरोना बाधित आढळली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही मुलांना ताप आणि खोकला झाला होता. त्यामुळे या बालसुधार गृहातील मुलांची कोरोना चाचणी करण्यात आली. ज्यानंतर यापैकी १४ मुलांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. १४ मुलं कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बालसुधारगृहाने आरोग्य विभागाशी संपर्क साधला. गुरूवारी एका आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये २५ मुलांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातले १४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. उल्हासनगर महापालिकेचे पीआरओ युवराज भदाणे यांनी ही माहिती दिली की १४ मुलांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर १० कर्मचाऱ्यांचीही आरटीपीसीआर टेस्ट आम्ही केली आहे. त्या टेस्टचे निकाल अद्याप यायचे आहेत.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...